Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘खण दुपट्टा’ घालतोय ऋतुजा बागवेच्या सौंदर्यात भर; फोटोवर सुबोध भावे अन् भाग्यश्री लिमयेची लक्षवेधी कमेंट

‘या गोजिरवाण्या घरात’ या लोकप्रिय मालिकेत सहाय्य्क भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात प्रवेश करणारी अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. ऋतुजा ही मराठी इंडस्ट्रीमधील अत्यंत सुशील आणि सोज्वळ अभिनेत्री आहे. हे आपल्याला नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून समजत असते. आजकाल ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिच्या सौंदर्याचे दर्शन ती तिच्या चाहत्यांना वारंवार देत असते. अशातच तिचा एक मराठमोळा लूक समोर आला आहे. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.

ऋतुजाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच या ड्रेसवर साजेशी अशी ऑक्साईड ज्वेलरी घातली आहे. तसेच कपाळी चंद्रकोर लावली आहे. या फोटोमधील खास आकर्षण म्हणजे ‘खण दुपट्टा’, जो तिच्या सौंदर्यात आणखी भर पाडत आहे. यासोबत तिने ओढणीला मॅचिंग अशी बॅग घेतली आहे. तिचा हा लूक खूप सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

तिचे चाहते सातत्याने कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तसेच अनेक कलाकार देखील तिच्या या फोटोवर सुबोध भावे आणि भाग्यश्री लिमये यांनी हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (marathi actress rutuja bagwe’s photo viral on social media)

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या.

यानंतर तिने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘महाराष्ट्राचा बहुरंगी, बहुढंगी तमाशा’, सोनाली कुलकर्णीच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

-‘अब क्या कहे क्या नाम ले…’, म्हणत अंकिता लोखंडेने लावले जोरदार ठुमके; डान्स व्हिडिओ व्हायरल

-व्हिडिओ: टायगर श्रॉफने गायलेल्या पहिल्या हिंदी गाण्याचा दमदार टिझर प्रदर्शित

हे देखील वाचा