टेलिव्हिजन अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही सध्या जोरदार चर्चेत आहे. ती झी मराठी या वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचे प्रोमो सध्या टीव्हीवर आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता तिला या मालिकेत बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्साही झाले आहेत. अशातच तिने प्रेक्षकांसाठी डबल धमाका आणला आहे. नुकतेच ऋताच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाले आहे. याची माहिती तिने सोशल मीडियावरून दिली आहे.
ऋताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या आगामी चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित केला आहे. या पोस्टरमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऋता अत्यंत डॅशिंग अंदाजात दिसत आहे. या पोस्टरवर ‘अनन्या’ असे लिहिलेले आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “अडथळ्यांना मारून लाथ जी संकटावर मात करते तीच खरी अनन्या! शक्य आहे तुम्ही जे ठरवलं ते शक्य आहे! सादर आहे मराठी चित्रपट ‘अनन्या’चे पहिले ऑफिशिअल मोशन पोस्टर.” तिचे अनेक चाहते तसेच अनेक कलाकार तिच्या या पोस्टवर कमेंट करून तिला शुभेच्छा देत आहेत. तिच्या या पोस्टवर फुलवा, सोनाली खरे, अमृता खानविलकर, ऋतुजा बागवे, प्रसाद ओक यांसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘अनन्या’ या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक प्रताप फड हे आहेत. तसेच या चित्रपटाचे निर्माते ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाबरिया हे आहेत. हे पोस्टर पाहून असे लक्षात येत आहे की, ही एका धाडसी मुलीची कहाणी आहे. हा पोस्टर पाहिल्यानंतर आता प्रेक्षक ऋताला या चित्रपटात पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. (marathi actress hruta durgule’s upcoming movie ananya’s poster release )
ऋताने याआधी ‘दुर्वा’, ‘फुलपाखरू’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेतील तिचे वैदेही हे पात्र चांगलेच गाजले होते. यानंतर तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये कमालीची वाढ झाली होती. तसेच तिने ‘स्ट्रॉबेरी शेक’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कंगना रणौतने शेअर केले बोल्ड लूकमधले फोटो; युजर्स म्हणाले, ‘तू दुसऱ्यांच्या पोस्टवर…’