Tuesday, March 17, 2026
Home बॉलीवूड करीना कपूरचा ‘3 इडियट्स’ मधील मंगेतर सुहास आठवतोय? आता पूर्ण बदलंय रूप, वेगळ्या अंदाजात जगतोय आयुष्य

करीना कपूरचा ‘3 इडियट्स’ मधील मंगेतर सुहास आठवतोय? आता पूर्ण बदलंय रूप, वेगळ्या अंदाजात जगतोय आयुष्य

अमीर खान अभिनिता 3 इडियट्स हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटामुळे यातील अनेक कलाकारांना लोक ओळखू लागले. तसेच या चित्रपटानंतर अनेक कलाकारांना उत्तम काम देखील मिळाले. तसेच या चित्रपटातील अगदी छोट्या छोट्या पात्र ज्यांनी साकारले त्या व्यक्तींनाही आजपर्यंत लोक विसरू शकले नाही. या चित्रपटामध्ये काम केलेले कलाकार म्हणजे आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, करीना (karina)कपूर आणि बोमन इराणी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.तर सहाय्यक पात्रं ‘सुहास’, करीना कपूरचा श्रीमंत होणारा नवरा हि भूमिका साकारली होती, तर हा अभिनेता आता काय करतो हे जाणून घेवुयात.

ओलिवियर लाफॉन्ट यांची कहाणी त्यांच्या चित्रपटातील भूमिकेपेक्षाही अधिक रंजक आहे. सुहासची भूमिका साकारणारे ओलिवियरचा जन्म पाकिस्तानमधील लाहोर येथे झाला. त्यांचे वडील पाकिस्तानचे आणि आई फ्रान्सची असल्यामुळे, त्यांनी आपले बालपण फ्रान्समध्ये घालवले. वयाच्या 16 व्या वर्षी ते भारतात आले. त्यांचे वडील इतिहासकार असून भारतीय उपखंडाचे विशेषज्ञ आहेत, त्यामुळेच ते तिथे स्थायिक झाले. वयाच्या 24 व्या वर्षी तो जाहिरातपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

ओलिवियर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत आणि ते वारंवार आपल्या आयुष्यातील क्षणचित्रे शेअर करत असतात. मात्र  आता त्यांच्यात खूप बदल झाला आहे. त्याने पुर्ण टक्कल केले आहे. 3 इडियट्स व्यतिरिक्त, ऑलिव्हियरने इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो हृतिक रोशन, ऐश्वर्या राय यांच्या ‘गुजारिश’ या चित्रपटाचा भाग होता. तो विजय राझ यांच्या ‘सोलमेट’ या चित्रपटाचा लेखकही आहे. त्याने अमिताभ बच्चन यांच्या ‘पा’ मध्ये सागरची भूमिका साकारली होती. तो ‘माही वे’, ‘खोटे सिक्के’ आणि ‘इश्क इन पॅरिस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

कंगना रनौतची सहकलाकार नवनींद्र बहल यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन

हे देखील वाचा