अलीकडच्या काळात चित्रपटप्रेमींना वेबसीरिज देखील खूप आवडत आहेत. बॉलिवूडचे अनेक बडे सितारे ओटीटी कंटेंट करण्यात रस दाखवत आहेत. आजकाल लोक हिंदी सिनेमांपेक्षा दाक्षिणात्य सिनेमे जास्त पसंत करत आहेत. साऊथमध्ये काही सर्वोत्तम वेबसीरिजही प्रदर्शित झाल्या आहेत. या वेबसीरिज तुम्ही वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी भाषेतही पाहू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत टॉप ५ वेब सीरीज.
१. क्वीन
रम्या कृष्णन स्टारर साऊथची वेब सीरिज ‘क्वीन’ ही एका मुलीची कथा आहे, जी तिच्या शाळेत टॉपर आहे. मात्र, काही परिस्थितीमुळे ती तिच्या शिक्षणाला मुकते. त्यानंतर ती चित्रपटांमध्ये काम करते आणि सुपरस्टार झाल्यानंतर ती राजकारणात भाग घेते. या मालिकेत तीन मोठे स्टार आहेत आणि तिघेही जबरदस्त अभिनय करतात. ही कथा जयललिता यांचा बायोपिक आहे, पण त्यात सर्व प्रकारच्या काल्पनिक कथाही जोडल्या गेल्या आहेत. तुम्ही ही सीरीज एमऐक्स प्लेयरवर पाहू शकता. या सीरिजचे ११ भाग आहेत आणि ते हिंदीमध्ये देखील उपलब्ध आहेत.
२. ट्रिपल्स
या यादीत पुढचं नाव आहे ‘ट्रिपल्स’ या सीरिजचं. ही एक रोमँटिक कॉमेडी ड्रामा वेब सीरिज आहे ज्यात कुमार, मधु आणि चिनू हे तीन मित्र आहेत. हे तीन जिगरी मित्र गुंडाकडून पैसे उधार घेऊन उदरनिर्वाहासाठी कॉफी शॉप उघडतात. मात्र, ते पैसे परत करणार असताना त्यांचे पैसे चोरीला जातात. तेव्हाच कुमार एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि नंतर त्यांचे लग्न होते, पण नंतर काही कारणास्तव हे नाते तुटते. यानंतर कुमार दुसरे लग्न करतो, त्यानंतर त्याची पहिली पत्नी पुन्हा येते. अशा परिस्थितीत आता कुमार मित्रांसोबत उधार घेतलेल्या गुंडांचे पैसे फेडेल की त्याच्या दोन्ही बायकांचे हे जाळे सोडवेल. तुम्ही डिस्नी प्लस हॉटस्टारवर हिंदीतील ही ८ भागांची वेबसीरिजही पाहू शकता.
३. वेल्ला राजा
साऊथची ही वेबसीरिज एक क्राईम थ्रिलर आहे, ज्यामध्ये अनेक कथा एकत्र पाहायला मिळतात. यामध्ये एक महिला अधिकारी आहे जिला अं’मली पदार्थांची व्यवस्था संपवायची आहे. एक शिक्षक आहे, ज्याला आपल्या शाळेसाठी आणि मुलांसाठी काहीतरी करायचे आहे. एक रिपोर्टर आहे, जिला एक कारखाना बंद करायचा आहे. कारण, त्यामुळे तिथे राहणाऱ्या अनेक मुलांना कॅन्सर होत आहे. तुम्ही ऍमेझॉन प्राईमवर ही १० भागांची वेबसीरिज पाहू शकता.
४. ऑटो शंकर
ही सीरीज तामिळनाडूच्या एका सीरियल किलर ‘ऑटो शंकर’च्या खऱ्या कथेवर आधारित क्राईम थ्रिलर आहे. या मालिकेतील दृश्ये जबरदस्त आहेत, परंतु त्यात काही प्रौढ दृश्ये आहेत, जी तुम्ही कुटुंबासह पाहू शकत नाही. ही सीरीज सेक्रेड गेम्ससारखी आहे आणि त्याचे १० भाग आहेत, जे तुम्ही झी५वर पाहू शकता.
५. पावा कढईगल
ही दक्षिणेतील एक ऐंथोलॉजी मालिका आहे, ज्यामध्ये ४ वेगवेगळ्या कथा दाखवल्या आहेत. पहिली कथा थंगमची आहे ज्यामध्ये एक मुस्लिम ट्रान्सजेंडर सर्बानंदच्या प्रेमात पडतो. त्यानंतर एका गुंडाची कथा आहे जो वेगळ्या जातीत लग्न करणाऱ्यांना निर्दयीपणे मारतो, पण नंतर त्याची स्वतःची मुलगीच असे करते. कल्की कोचलिन, साई पल्लवी आणि प्रकाश राज सारखे अनेक स्टार्स या वेबसीरिजचा भाग आहेत. तुम्ही ही सीरीज नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
डीपनेक ड्रेसमधील मलायकाच्या उघड्या अंगावर ठेवला व्यक्तीने हात, डोकंच धरून बसली अभिनेत्री, व्हिडिओ व्हायरल
बादशाहला नव्हते बनायचे गायक?, म्हणाला, ‘आतापर्यंत चुकीच्या ठिकाणी होतो…’
तिसऱ्यांदा गरोदर राहिल्याच्या बातम्यांवर संतापली करीना; म्हणाली, ‘मी काय यंत्र…’