Monday, June 9, 2025
Home कॅलेंडर शिक्षकदिन विशेष: ‘दंगल’ ते ‘हवा हवाई’पर्यंत बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट ठरलेत लहान मुलांसाठी प्रेरणादायी

शिक्षकदिन विशेष: ‘दंगल’ ते ‘हवा हवाई’पर्यंत बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट ठरलेत लहान मुलांसाठी प्रेरणादायी

शिक्षकांशिवाय प्रत्येकाचे आयुष्य अपुरे आहे. जर कोणतीही गोष्ट शिकायची असेल, तर पहिली शिक्षकांची गरज असते. पण ते नसतील तर आपले आयुष्यात काहीच अर्थ नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे अनेक वेगवेगळ्या टप्प्यांवर शिक्षक येतात आणि जातात सुध्दा. एका व्यक्तीला आयुष्यात पुढे नेण्याचे काम फक्त एक शिक्षकच करू शकतात. तसेच शिक्षकांना मानवंदना करण्यासाठी एक विशेष ठरवण्यात आले आहे. हा दिवस दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी, भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. या विशेष दिवशी एका विद्यार्थ्याने पाहावेत असे हे चित्रपट आहेत.

आपण आपल्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करून जेव्हा धाडसाने पुढे जाऊ, तेव्हाच काहीतरी घडू शकते. बॉलिवूडमध्ये अशाच धाडसी वृत्तीने आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगाला सामोरे जाऊन स्वतः चे स्वप्न पुर्ण करुन दाखवणार्‍या चित्रपटांच्या स्टोरीज आहे. चला तर पाहुयात कोणते आहेत हे चित्रपट.

हवा हवाई
या यादीतील पहिला चित्रपट ‘हवा हवाई’ आहे. या चित्रपट एका मुलाची कथा दाखवली आहे. जो खूप छान स्केटींग करतो. स्केटिंगचे कौशल्य असूनही हा मुलगा दुकानात चहा विकण्याचे काम करतो. साकिब सलीम या चित्रपटात त्याच्या शिक्षकाची भूमिका साकारताना दिसतो, जो त्या मुलाला मोठं होण्यास मदत करतो. हा चित्रपट पाहून आपल्याला कळते की, आयुष्यात कितीही वाईट टप्पा आला, तरी आपण कधीही हार मानू नये. माणसाच्या मनात जिद्द असेल तर एक गरीब माणूसही स्वतः ला सिद्ध करुन दाखवू शकतो.

चिल्लर पार्टी
‘चिल्लर पार्टी’ या चित्रपटात पहिल्यांदा मुलांची टोळी दाखवण्यात आली आहे. जे रस्त्यावर राहणाऱ्या प्राण्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रकारच्या नवीन कल्पनांचा शोध घेतात. हा चित्रपट बघून असे दिसून येते की, जर आपल्याला हवे असेल तर आपण या जगात काहीही करू शकतो. हा चित्रपट मुलांमध्ये प्रत्येकाविषयी आदर निर्माण करतो.

निल बट्टे सन्नाटा
‘निल बट्टे सन्नाटा’ चित्रपटात आपण अभिनेत्री स्वरा भास्करला एका आईच्या भूमिकेत पाहू शकतो. जी आपल्या मुलीला खूप शिक्षण देण्याचे स्वप्न बघते. तिला आपल्या मुलीला दुसर्‍या लोकांच्या घरात काम करू द्यायचे नसते. या चित्रपटाचा ट्विस्ट म्हणजे, स्वराच्या मुलीने मनात एक गोष्ट पक्की करून ठेवली आहे. ती म्हणजे एका कामवालीची मुलगी फक्त कामवालीच बनू शकते. या पलीकडे तिचे भविष्य नाही. हा चित्रपट बघून कळते की, एकटी आई आपल्या मुलांसाठी कशी मेहनत घेते आणि त्यांचे संगोपन कसे करते.

दंगल
बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाने जगभरात हजारो कोटींचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही, तर जगभरात चांगला प्रसिद्ध झाला. या चित्रपटात असे दाखवण्यात आले आहे की, फक्त मुलेच नाही तर घरातील मुलीसुद्धा बाहेर येऊन आपल्या घराचे आणि देशाचे नाव उंचावू शकतात. हा चित्रपट स्त्री शक्तीचा संदेश देतो. जिथे हा चित्रपट सांगतो की मुलांनी अभ्यासाबरोबरच खेळांमध्येही सहभाग घेतला पाहिजे.

आय एम कलाम
‘आय एम कलाम’ हा चित्रपट भारतातील प्रत्येक शाळेत दाखवण्यात आला होता. तो भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या नावाने बनवण्यात आला आहे. या चित्रपटात एका बालकामगाराला अभ्यासाची खूप आवड आहे. टीव्हीवर अब्दुल कलाम यांचे भाषण ऐकून तो बालकामगार खूप प्रभावित होतो.

हे भाषण ऐकल्यानंतर हा मुलगा स्वप्न पाहतो की, तो वाचन आणि लेखन करून मोठा माणूस होईल. म्हणून या मुलाचे सर्वत्र कौतुक केले जाते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ

-देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा