हॉलिवूड, बॉलिवूड आणि टॉलिवूड यांसारख्या सिनेसृष्टीत तर इंटिमेट तसेच किसींग सीन पाहायला मिळणे आता सामान्य झाले आहे. प्रेक्षकही या गोष्टींकडे आकर्षित होत असल्याने चित्रपट निर्मातेही आपल्या सिनेमात अशा सीनचा आवर्जुन समावेश करतात. पण मंडळी यामध्ये आपली मराठी सिनेसृष्टीही मागे नाहीये बघा. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या काळातील सिनेमात दोन फुले एकमेकांना स्पर्श करून काहीतरी सुरू असल्याचं दाखवलं जायचं. आता काळानुसार मराठी सिनेसृष्टीही बदललीय. त्यात आता या सर्व गोष्टीं मागे सोडत ऑनस्क्रीन किसींग सीन सर्रास दाखवले जातायत. आपण असेच किसींग सीन पाहणार आहोत.
2009 साली रिलीझ झालेला राजीव पाटील दिग्दर्शित ‘जोगवा’ हा एक राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा होता. यात मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये यांनी ‘जोगता’ आणि ‘जोगतीन’ यांच्या रोलमध्ये होते. त्यांच्यातील केमिस्ट्रीने चाहत्यांना भलतीच आवडली होती. दोघांमधील हॉट किसींग सीननं तर सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होतं. हे सर्व ऑन-स्क्रीन इतकं वास्तविक दिसत होतं की, त्यावेळी फक्त ‘जोगवा’चीच चर्चा सुरू होती.
निखिल महाजन दिग्दर्शित ‘पुणे 52’ हा एका जोडप्यावर आधारित थ्रिलर सिनेमा होता. गिरीश कुलकर्णी आणि सई ताम्हणकर या जोडीने सिनेमात अफलातून अभिनय केला. या ऑनस्क्रीन जोडप्याच्या रोमान्सनं तर पडद्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला. सिनेमातील त्यांच्या इंटिमेट, लिप-लॉक आणि लाँग किसींग सीनने प्रेक्षकांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या होत्या.
तरुणाईला वेड लावणाऱ्या सिनेमामध्ये समावेश होतो, तो म्हणजे स्वप्ना जोशी दिग्दर्शित ‘मितवा‘ सिनेमाचा. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमानं कमालच केली. सिनेमात टिपिकल प्रेमकथेचे सर्व घटक होते. त्यातही स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णीच्या जबरदस्त केमिस्ट्रीनं सर्वांना बेधुंद केलं होतं. त्यांच्यातील लाँग किसींग सीनने प्रेक्षकांच्या मनावरही भुरळ घातली होती.
समीर विद्वांस यांच्या ‘टाईमप्लीज’ या सिनेमात लग्नानंतर प्रेमात पडलेल्या जोडप्याची कहाणी दाखवलीय. ‘टाईमप्लीज’ सिनेमात काम करणारे उमेश कामत आणि प्रिया बापट हे खऱ्या आयुष्यातील जोडपे होते. या सिनेमातील त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांचा लिप- लॉक सीन हा कळीचा विषय ठरला होता. या दोघांनीही आपल्या रोमान्सने पडद्यावर मोहोर उमटवली होती.
‘दुभंग‘ या सिनेमात खऱ्या आयुष्यात पती- पत्नी असणाऱ्या आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांच्यातील रोमान्स दाखवलाय. विशेष म्हणजे हा सिनेमा दिग्दर्शित केला होता, ते आदिनाथ कोठारेचे वडील आणि दिग्गज अभिनेते- दिग्दर्शक महेश कोठारेंनी. आदिनाथ आणि उर्मिलाच्या लिप लॉक सीनने सिनेमा आणखी रोमँटिक बनवला. त्यांच्यातील केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा रंगली होती.