Monday, July 1, 2024

कमालच ना! ६० वर्षांच्या गरीब म्हाताऱ्याचं एका रात्रीत पालटलं नशीब; बनला सुप्रसिद्ध मॉडेल

सध्या सोशल मीडियाच्या जगात कोणाचे नशीब कधी चमकेल आणि कोण कधी स्टार होईल याचा काही नेम नाही. बदाम बदाम गाण्याची कथा तर तुम्हाला माहीतच आहे. रस्त्यावर फिरत फिरत बदाम विकताना गायलेले हे गाणे इतके प्रसिद्ध झाले की, तो गरीब माणूस रातोरात स्टार झाला आणि ते गाणे आजही चर्चेत आहे. आता असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये मोलमजुरी करून पोट भरणारा गरीब व्यक्ती रातोरात प्रसिद्ध मॉडेल म्हणून समोर आला आहे. काय आहे हा सगळा प्रकार चला जाणून घेऊ.

केरळ मधील ६० वर्षीय मजूर मम्मिकाच्या नशिबाने अशी काही बाजी मारली की, त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे. म्हणजे दिवसभर कष्ट करून पोट भरणारा हा व्यक्ती अचानक प्रसिद्ध मॉडेल म्हणून ओळखला जाऊ लागला. हे सगळे शक्य झाले एका प्रसिद्ध फोटोग्राफरच्या पारखी नजरेमुळे.

दररोज लुंगी आणि मळलेला शर्ट घालून दिवस काढणारा मम्मिका आता सुटाबुटात आणि गॉगल घालून सोशल मीडियावर झळकू लागला आहे. त्याच्या या व्हायरल फोटोवरून तो एक गरीब मजूर असेल याचा कुणालाही अंदाज लागत नाही. एका फोटोग्राफरच्या नजरेस पडलेला मम्मिका त्याला मॉडेल म्हणून योग्य वाटला आणि इथूनच मम्मिकाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

या प्रसिद्ध आणि पारखी फोटोग्राफरचे नाव शारिक वायलिल (Shareek Vayalil) आहे. तो कोझिकोडमध्ये राहतो. या शारिकची नजर मम्मिकावर पडली आणि त्याला मॉडेल म्हणून त्याचा लूक आवडला. या मम्मिकाला सूटबूट घालून गॉगल लावून फोटो शूट केले आणि बघता बघता गरीब मम्मिका सुप्रसिद्ध मॉडेल झाला. त्याचे हे डॅशिंग फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे लुंगी घालून चालणारा मम्मिका मॉडेल झाला याचासुद्धा खुलासा केला आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा