Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना राष्ट्रीय पुरस्कार

मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज (शुक्रवार, 22 जुलै) रोजी करण्यात आली. यंदा 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. यात राहुल देशपांडे यांना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना या पुरस्कारांसाठी नामांकने दिली जातात. ( 68th national film festival rahul deshpande won national award of playback singer )

https://www.instagram.com/p/CfmK5tiBKkt/?utm_source=ig_web_copy_link

राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटासोबतच राहुल देशपांडे यांच्या गायकीचीही जोरदार तारिफ होत होती. अखेर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या पाठीवर कौतूकाची सर्वोच्च थाप पडली आहे.

अधिक वाचा –
रणवीर, लेका काय केलंस हे? चार पैशांसाठी आख्खा ‘नग्न’ झाला अभिनेता, बघा Viral फोटो
उर्वशीची फॅशन पाहून डोक्याला हात लावाल? पुढे-मागे सगळीकडे फाटलीये पँट

हे देखील वाचा