Saturday, January 17, 2026
Home साऊथ सिनेमा ७० वर्षांच्या सुपरस्टारपुढे ‘द राजासाब’ ठरला फिका, ५ दिवसांत बॉक्स ऑफिसवर प्रभासला टाकलं मागे

७० वर्षांच्या सुपरस्टारपुढे ‘द राजासाब’ ठरला फिका, ५ दिवसांत बॉक्स ऑफिसवर प्रभासला टाकलं मागे

2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या अनेक दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपली छाप उमटवली आहे. काही चित्रपट सुपरहिट ठरले, तर काहींना अपेक्षित यश मिळू शकले नाही. 9 जानेवारीला प्रदर्शित झालेला प्रभासचा बहुचर्चित चित्रपट ‘द राजासाब’ सुरुवातीच्या वीकेंडपर्यंतच प्रभाव दाखवू शकला. त्यानंतर मात्र चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घट होताना दिसत आहे. दुसरीकडे, 70 वर्षीय मेगास्टार चिरंजीवी यांचा ‘मन शंकर वर प्रसाद गारू’ हा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन ट्रॅकर सॅकनिल्कनुसार, ‘मन शंकर वर प्रसाद गारू’ने पहिल्याच दिवशी 32.25 कोटींची कमाई केली, तर प्री-रिलीज शोमधून 9.35 कोटी रुपये मिळवले.

  • दुसरा दिवस: 18.75 कोटी

  • तिसरा दिवस: 19.5 कोटी

  • चौथा दिवस: 22 कोटी

  • पाचवा दिवस: 18.5 कोटी

अवघ्या 5 दिवसांत या चित्रपटाने भारतात 120.35 कोटी रुपये, तर जागतिक पातळीवर 175.25 कोटी रुपये कमावले आहेत. 2026 मध्ये 5 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा तेलुगू सिनेमातील पहिला चित्रपट ठरला आहे.

प्रभास,(Prabhas) संजय दत्त, मालविका मोहनन, निधी अग्रवाल, बोमन इराणी आणि रिद्धी कुमार यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘द राजासाब’ने पहिल्या आठवड्यात 130.25 कोटींचा व्यवसाय केला. मात्र, आठव्या दिवशी चित्रपटाला केवळ 3.50 कोटींची कमाई करता आली.

पाचव्या दिवशी ‘द राजासाब’ने फक्त 4.8 कोटी कमावले, तर त्याच दिवशी चिरंजीवींच्या चित्रपटाने 18.5 कोटींची घसघशीत कमाई केली. त्यामुळे प्रभासच्या चित्रपटाची कमाई घसरताना, चिरंजीवींचा ग्राफ मात्र वेगाने वर जाताना दिसतो आहे.

सुमारे 200 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘मन शंकर वर प्रसाद गारू’ने आतापर्यंत आपल्या बजेटच्या 50 टक्क्यांहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात चिरंजीवींसोबत नयनतारा प्रमुख भूमिकेत असून, दिग्दर्शक अनिल रविपुडी आणि चिरंजीवी यांची ही पहिलीच जोडी आहे. बॉक्स ऑफिसवर मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, हा चित्रपट लवकरच आणखी मोठे विक्रम प्रस्थापित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

Happy Patel VS Rahu Ketu: ‘हॅपी पटेल’ आणि ‘राहु केतु’ यांच्यात तगडी टक्कर, बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी असा राहिला खेळ

हे देखील वाचा