अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही तिच्या बिनधास्तपणामुळे नेहमीच चर्चेत अस़ते. ती सोशल मीडियावर खुपच सक्रिय असते. शेतकरी आंदेलनपासून ते अगदी बाॅलिवूडच्या प्रत्येक हालचालींकडे तिचे बारिक लक्ष असते. तिने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आलिया भट्टचा (Alia Bhatt) रिलीझ झालेला चित्रपट ‘गंगूबाई काठियावाड़ी’ या चित्रपटाचे नाव न घेता तिने कौतुक केले आहे. ती म्हणते की, काही चित्रपट माफिया चांगले काम करतील असे वाटले नव्हते.
कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करताना लिहीले की, “दक्षिण चित्रपट उद्दोगाने रेकॅार्डब्रेक कलेक्शन सिनेमागृहात पुनरुज्जीवन केले आहे, हे एकुन आनंद झाला. हिंदी चित्रपटाची छोटी छोटी पावले उचलली जात आहेत. अलीकडेच एक स्त्रीकेंद्रित चित्रपटा आला, ज्याचा एक मोठा हिरो आणि सुपरस्टार दिग्दर्शक आहे, ही छोटी छोटी पावले असू शकतात. येथे व्हेंटिलेटरवर असलेल्या सिनेमागृहांसाठी हे सर्व टप्पे महत्त्वाचे ठरतील. ही चांगली गोष्ट आहे.” ती पुढे म्हणते, “चित्रपट माफिया प्रसंगानरूप उठून काहीतरी चांगले करतील, अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. त्यांनी तसे केल्यास मी त्यांचे कौतुक करते आणि सर्वोत्तमाची आशा करते.”
यापूर्वी तिने आलिया आणि गंगुबाई यांच्यावर टीका केली होती. अभिनेत्री म्हणाली होती, “शुक्रवारी ऑफिसवर २०० करोड जळून खाक होतील. सर्वात मोठी कमतरता म्हणजे फिल्मची कास्टिंग चुकीची आहे. त्यात सुधारणा होणार नाही.”
साल २०२१ मध्ये कंगना ‘थलायवी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. ‘मर्णिकर्णिका’, ‘पंगा’, ‘तनू वेड्स मनू’ याचील तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली.
हेही वाचा