Monday, July 8, 2024

बाहुबली 3 | बाहुबली पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला? मुलाखतीत प्रभासचा मोठा खुलासा

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत असतात. त्यातच तो त्याच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याच्या अभिनयाची तर तोडच नाही. त्याने साकारलेल्या बाहुबलीच्या पात्राने प्रत्येकाला भुरळ घातली होती. त्यातच त्याच्या चाहत्यांसाठी त्याने मोठा खुलासा केला आहे. तो परत बाहुबलीच्या पात्रात दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यासोबत तो लवकरच काम करणार आहे. बाहुबली चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच येऊ शकतो, अशा चर्चेला उधान आले आहे. यातच त्याचे चाहते त्याला परत बाहुबलीच्या पात्रात पाहण्यास उत्सुक आहेत. 

‘बाहुबली’च्या दोन गाजलेल्या भागानंतर त्याच्या तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा चालू झाली आहे. परंतु आत्तापर्यंत या बाबतीत कोणतीच अधिकृत घोषणा केली नाही. काही वृत्ताद्वारे दिग्दर्शक एसएस राजामौली आणि प्रभास हे तिसऱ्या भागावर काम चालू करणार आहेत, असे सांगण्यात येत आहे. पण ‘बाहुबली ३’साठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. कारण प्रभास आता त्याच्या दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

प्रभासचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पूजा हेगडेही दिसणार आहे. चित्रपट १९७०च्या काळानुसार बनवला गेला आहे. प्रभासचा हा चित्रपट बिग बजेट प्रोजेक्ट आहे. एका मुलाखतीच्या दरम्यान ‘राधे श्याम’चे दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांनी प्रभासचं खूप कौतुक केलं.

दुसरीकडे, दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राम चरण, आलिया भट्ट, अजय देवगण हे कलाकार दिसणार आहेत. प्रभासही त्याच्या ‘आदिपुरुष’नंतर ‘सालार’ आणि अन्य प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा