नव्वदच्या दशकातील सुपरहिट बालकलाकारांवर आज आलीय ‘ही’ वेळ, कुणी करतंय संघर्ष तर कुणी…


नव्वदचे शतक हे सगळ्यांच्याच आठवणीत आहे. या दशकातील गाणी, चित्रपट ,कलाकार सगळ्यांची एक वेगळीच मजा होती. याच काळात अनेक बाल कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनावर राज्य केले आहे. यापैकी काहींनी मोठे झाल्यानंतरही खूप चांगलं नाव कमावलं तर काहींना पुढे जाऊन एक भरकटलेले आयुष जगाव लागतंय. चला तर मंडळी आज आम्ही तुम्हाला अश्याच काही बाल कलाकारांबद्दल सांगणार आहोत. आहात ना रेडी…

सना सईद
‘कुछ कुछ होता है ‘या चित्रपटातील छोटी अंजली तर तुम्हा सगळ्यांना आठवत असेलच. या चित्रपटात अंजलीच पात्र खूपच महत्वाचं होतं.  शाहरुख खानची मुलगी अंजली हीच पात्र सना सईद हिने निभावलं होतं .त्यानंतर सनाने अनेक चित्रपटांत बाल कलाकार म्हणून काम केले, परंतु मोठी होताच ती सिनेसृष्टीतीतून गायब झाली. 2012 साली सना ‘स्टूडेंट ऑफ द इअर ‘ या चित्रपटात शेवटची दिसली होती.

पूजा रूपामेल
‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ या चित्रपटात काजलची छोटी बहिन छुटकीच पात्र निभावणारी अभिनेत्री खूपच चर्चेत होती. ती अभिनेत्री म्हणजे पूजा रूपामेल. पूजा या पात्रमुळे खूपच लोकप्रिय झाली पण मोठे होऊन तीला या क्षेत्रात फारसे नाव कमावता आले नाही.

तन्वी हेगडे
जर तुम्ही 90 च्या शतकातील सिनेमे व मालिका पाहिल्या असतील तर तुम्ही सोनपरी ही मालिकाही नक्कीच पाहिली असेल. मुलांना या लोकप्रिय शोमधील फ्रूटी खूपच आवडत असे. पण ती छोटीशी फ्रूटी आता खूप मोठी झाली आहे आणि खूप सुंदर दिसायला लागलीये. परंतु ती आता चित्रपटसृष्टीतून गायब झाली आहे.

झनक शुक्ला
‘करिश्मा का करिश्मा’मधील रोबोट म्हणजे करिश्मा सगळ्यांना आठवत असेल. या शोमध्ये करिश्माच पात्र ‘झनक शुक्ला’ हिने निभावलं होत. झनक ही कुमकुम भाग्यची अभिनेत्री सुप्रिया शुक्ला आणि हरील शुक्ला यांनी मुलगी. झनकने शाहरुख खान सोबत त्याच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटात देखील काम केले आहे. झनक सुद्धा आता खूप मोठी झाली आहे आणि खूप सुंदर देखील दिसत आहे. परंतु ती आता सिनेमात दिसत नाही.

कुणाल खेमू
‘राजा हिंदुस्तानी’, ‘ जख्म ‘ आणि ‘हम है राही प्यार के ‘ या चित्रपटातील बाल कलाकाराची भूमिका निभावणारा कलाकार कुणाल खेमू हा देखील तेव्हा खूप लोकप्रिय झाला होता. कुणालला जेवढे यश ‘अजय देवगण ‘याच्या ‘जख्म’ या चित्रपटातून मिळाले तेवढे यश त्याला पुढे जावून मिळवता आले नाही. असे असले तरीही त्याने अनेक चांगल्या सिनेमात चांगल्या भूमिका केल्या. अनेक चित्रपटात नायक किंवा सहनायकाच्या भूमिका केल्या परंतू त्याला कधीच बॉलीवूडच्या पहिल्या फळीतील कलाकार होता आले नाही. सध्या तो अनेक वेब सीरिजमध्ये चांगले काम करत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.