Saturday, March 14, 2026
Home साऊथ सिनेमा या ब्लॉकबस्टर रोमँटिक चित्रपटाने त्याच्या बजेटपेक्षा कितीतरी पट जास्त केली कमाई, IMDb वर आहे उत्तम रेटिंग

या ब्लॉकबस्टर रोमँटिक चित्रपटाने त्याच्या बजेटपेक्षा कितीतरी पट जास्त केली कमाई, IMDb वर आहे उत्तम रेटिंग

ओटीटी प्लॅटफॉर्म वरती अनेक प्रकारचे कंटेंट आता येत आहे, त्यामुळे प्रेक्षकांचे ओटीटी कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. आणि या कंटेंट मध्ये अनेक प्रकारचे म्हणजे अश्लील, तसेच सत्य घटनेवर आधारित, साधा व सरळ अशा वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट Ott वर उपलब्ध आहे. तर असा एक कंटेंट आहे, जो त्याच्या साध्या कथेने आणि उत्कृष्ट पटकथेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यात एकही अश्लील दृश्य नाही. तरीही, त्याची आकर्षक कथा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरली.

तर हा चित्रपट म्हणजे ’98’ हा आहे. तर या कथेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले. तसेच याच्या बजेट पेक्षा अनेक पटीने कमाई सुद्धा केली आहे. तर हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. तमिळ भाषेतील ’96’ हा चित्रपट विजय सेतुपती आणि त्रिशा कृष्णन अभिनीत एक रोमँटिक ड्रामा आहे. तसेच आदित्य भास्कर, देवदर्शिनी चेतन, नियती कादंबी आणि भागवती पेरुमल हे देखील चित्रपटात आहेत.

’96’ ची कथा के. रामचंद्रन आणि जानकी यांच्याभोवती फिरते, जे लहानपणी प्रेमात पडले होते. चित्रपटात रामचंद्रन आणि जानकी एकाच शाळेत शिकत असल्याचे दाखवले आहे. पण कधीही त्यांचे प्रेम व्यक्त करत नाहीत. नंतर, जानकी कोणालाही न सांगता शहर सोडून तिच्या कुटुंबासह राहायला जाते. 22 वर्षांनंतर, वर्गातील सर्व विद्यार्थी पुन्हा एकत्र येतात तेव्हा ही कथा भावनिक वळण घेते.

विजय (vijay)सेतुपती आणि त्रिषा कृष्णन अभिनीत हा चित्रपट 15 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला आहे. जगभरात 55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तुम्ही तो हिंदीमध्ये सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पाहू शकता. सी. प्रेम कुमार लिखित आणि दिग्दर्शित ’96’ ला आयएमडीबीवर 8.5 रेटिंग मिळाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर, ‘बॉर्डर २’ आता ओटीटीवर येणार; या ठिकाणी पाहू शकता सिनेमा

हे देखील वाचा