‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा टीव्हीच्या दुनियेतला असाच एक शो आहे, जो प्रत्येक घरात खूप लोकप्रिय आहे. पण त्यासोबतच शोचे सर्व कलाकारही खूप लोकप्रिय आहेत. या शोमध्ये बबिता जीची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताचे (Munmun Dutta) नावही लोकप्रियतेच्या यादीत टॉपला आहे.
बबिता या शोमध्ये अय्यरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत असली, तरी अय्यरपेक्षाही ती जेठालालसोबतच्या केमिस्ट्रीसाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे, जेठालाल नेहमीच तिच्यासोबत फ्लर्ट करताना दिसतो आणि चाहत्यांना दोघांची ही शैली आवडते. दुसरीकडे, या शो व्यतिरिक्त, मुनमुन दत्ता तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. मुनमुनला तुम्ही रोज बबिता जीच्या भूमिकेत पाहता, पण तुम्हाला माहित आहे का की, या शो व्यतिरिक्त तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे? होय, टीव्ही जगतातील बबिता जी चित्रपटांमध्येही दिसली आहे. (munmun dutta also worked in these films)
‘या’ चित्रपटांमध्ये दिसलीय अभिनेत्री
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोची बबिता जी फेम मुनमुन दत्ता अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. ज्यातील एक मोठे नाव आहे कमल हासनचा (Kamal Haasan) २००५ साली आलेला चित्रपट ‘मुंबई एक्सप्रेस’. याशिवाय मुनमुन दत्ताने पूजा भट्ट (Pooja Bhatt) दिग्दर्शित ‘हॉलिडे’ चित्रपटातही काम केले आहे. हा चित्रपट २००६ साली आला होता. २०१८ मध्ये तिने ‘द लिटिल देवी’ या चित्रपटातूनही तिने धमाल केली होती. या सर्वांशिवाय मुनमुनने ‘मुन गांधी नुहेन’ आणि ‘अमर आकाश मेघ ब्रिष्टी’ या दोन बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे.
‘या’ शोमधून केली करिअरची सुरुवात
मुनमुन दत्ताने २००४ मध्ये ‘हम सब बाराती’ या शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यात दिलीप जोशीही (Dilip Joshi) होते. मात्र, मुनमुन आता २००८ पासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचा भाग आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा