Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड करण जोहरची ‘ती’ पोस्ट कुणासाठी? म्हणतोय ‘थांबा रक्तपात होणार आहे…’

करण जोहरची ‘ती’ पोस्ट कुणासाठी? म्हणतोय ‘थांबा रक्तपात होणार आहे…’

सध्या हिंदी सिने जगतात अनेक धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अनेक ऐतिहासिक आणि नाविण्यपूर्ण कथा असलेल्या या चित्रपटांना प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. असाच धमाकेदार चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. कारण खुद्द करण जोहरच्या सोशल मीडिया पोस्टमुळे हे संकेत मिळाले आहेत. करण जोहर (Karan Johar) हा एक प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माता आहे, ज्याने आतापर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. आता, त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.

बॉलिवूड निर्माता करण जोहर त्याच्या चित्रपटांइतकाच सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतो. सोशल मीडियावरुन अलिकडेच करण जोहरने एक पोस्ट केली आहे ज्यामुळे करण जोहरचा नवीन चित्रपट येणार आहे का अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.करण जोहरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून २५ जुलै रोजी तो काही घोषणा करणार असल्याची माहिती दिली आहे.

जोहरने आपल्या पोस्टमध्ये’काही रक्तपात होणार आहे, थांबा, मी 10 वाजता काहीतरी घोषणा करेन,” असा कॅप्शन दिला आहे. करण जोहरची ही पोस्ट समोर आल्यानंतर लोकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली असून तो काय घोषणा करणार आहे, असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे. मात्र, याविषयी फक्त करण जोहरलाच कळू शकेल, पण त्याने ज्या पद्धतीने पोस्ट शेअर केली, त्यावरून तो एका मोठ्या चित्रपट प्रकल्पाची घोषणा करणार असल्याचे मानले जात आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

 

अलीकडेच, करण जोहर निर्मित ‘लायगर’ चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे, ज्यामध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलर आल्यानंतर या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे, ज्याचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ करत आहेत. दरम्यान करण जोहरचा कॉफी विथ करण हा कार्यक्रमही सध्या चांगलाच चर्चेत आहे.

हेही वाचा –

जेव्हा चाहत्याने फेकून दिला होता महमूद यांचा ऑटोग्राफ,,धर्मेंद्र यांनी शेअर केला ‘तो’ मजेशीर किस्सा

विकी कौशलची क्रेझच निराळी! सेल्फी मिळेना म्हणून चाहतीने चक्क दिला बोहल्यावर चढण्यास नकार

घटस्फोटानंतर १० महिन्यांनी नागा चैतन्यने केले मन मोकळे, सांगितली ‘ती’ भयाण गोष्ट

 

हे देखील वाचा