Saturday, December 14, 2024
[aioseo_breadcrumbs]

पारस छाबराला डेट करायची मिका सिंगची होणारी पत्नी, जाणून घ्या कोण आहे आकांक्षा पुरी

बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर आणि गायक मिका सिंगला (Mika Singh) अखेर त्याची वधू मिळाली आहे. मिकाने त्याची मैत्रीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा पुरीची (Akansha Puri) वधू म्हणून निवड केली आहे, मात्र दोघांनी अद्याप लग्न केले नाही. मिकाने केवळ कंगन आणि वरमाला घालून आकांक्षाला आपली वधू म्हणून निवडल्याची घोषणा केली आहे. आता मिका आणि आकांक्षा कधी लग्न करणार, याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असेल. पण तोपर्यंत आम्ही तुम्हाला मिकाच्या होणाऱ्या वधूबद्दल म्हणजे आकांक्षाबद्दल सांगतो.

वडिल पोलिसात, तर आहे आई ज्योतिषी 
आकांक्षा पुरीचा जन्म २६ जुलै १९८८ रोजी भोपाळ, मध्य प्रदेश येथे झाला. येथून तिने आपले शिक्षण पूर्ण केले. तिचे वडील आरके पुरी हे निवृत्त एसीपी आहेत. तर आई चित्रा पुरी ज्योतिषी आहेत. (mika di voti winner akanksha puri is ex girlfriend of model paras chhabra)

अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेल देखील आहे आकांक्षा 
आकांक्षा पुरी अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेल देखील आहे. २०१० मध्ये आकांक्षाने मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. यानंतर तिने अनेक लोकप्रिय प्रिंट शूटही केले. अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही ती दिसली. त्यानंतर साऊथच्या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

‘कॅलेंडर गर्ल’ मधून बॉलिवूड पदार्पण 
आकांक्षाने २०१५ मध्ये मधुर भांडारकरच्या ‘कॅलेंडर गर्ल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात आकांक्षाने ‘नंदिता मेनन’ची भूमिका साकारली होती, जी लोकांना खूप आवडली होती. आकांक्षाने ‘चिट्टी’, ‘जहाँ तुम हो’, ‘मैं जिस दिन भुला दूं’, ‘बेवफा तेरा मुस्कुराना’ यांसारखे अनेक म्युझिक व्हिडिओ देखील केले आहेत.

पारस छाब्राला केलंय डेट 
आकांक्षा ‘बिग बॉस १३’ फेम पारस छाब्राला (Paras Chhabra) डेट करत होती. पण पारस आणि माहिराची जवळीक वाढल्यानंतर आकांक्षा आणि पारस वेगळे झाले. पारस छाबरासोबत आकांक्षा पुरीचं नातं फार काळ टिकू शकलं नसलं, तरी मिका सिंगमध्ये आकांक्षा पुरीला एका मित्रासोबत जीवनसाथी मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा