हिंदी सिनेसृष्टीला शंभरहून अधिक वर्षे लोटले. यादरम्यान असे अनेक सिनेमे होऊन गेलेत, ज्यांची गणना आजही सर्वोत्तम सिनेमांमध्ये केली जाते. ‘शोमॅन’ राज कपूर यांचा ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा सिनेमाही त्यातलाच एक. 1978 साली रिलीझ झालेल्या या सिनेमाच्या कथेपासून ते गाणी आणि संवादांपर्यंत सर्वच गोष्टींना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. सिनेमातल्या स्टारकास्टनंही प्रेक्षकांची मनं जिंकली. या सिनेमात होती त्याकाळजी बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री झीनत अमान. तिने बोल्ड पात्र साकारलं होतं. त्यामुळं तिचे हे पात्र आजही इंडस्ट्रीच्या सर्वात बोल्ड पात्रांमध्ये गणलं जातंय, पण मंडळी तुम्हाला माहितीये का, या सुपरहिट सिनेमासाठी झीनत अमान या पहिली आवड नव्हत्याच. मग कोण होती ती अभिनेत्री आणि कशाप्रकारे झीनत अमानला ही भूमिका मिळाली, चला जाणून घेऊया या लेखातून…
ज्या अभिनेत्रीला हा रोल मिळाला होता, त्या अभिनेत्रीला होता तब्बल 63 सिनेमाचा दांडगा अनुभव. ती अभिनेत्री होती ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी. ‘सत्यम शिवम सुंदरम’ सिनेमाचे दिग्दर्शक राज कपूर यांनी हेमा मालिनी यांना हा सिनेमा ऑफर केला होता. सिनेमाची स्क्रिप्ट जेव्हा हेमा मालिनींनी ऐकली, आणि बसला ना त्यांना धक्का. कारण सिनेमातलं रुपाचं पात्र हे हेमा मालिनी यांच्या आतापर्यंतच्या पात्रांपेक्षा एकदम वेगळं होतं. आता एका सिनेमामुळं आपली प्रतिमा कोण बदलेल ना? याच कारणामुळं हेमा मालिनी यांना हे पात्र साकारायचं नव्हतं, पण त्यावेळी ते राज कपूर यांच्या शब्दापुढं कसल्या जातात. त्या नकार देऊ शकल्या नाहीत.
यानंतर हेमा मालिनी शूटिंगसाठी पहिल्या दिवशी सेटवर पोहोचल्या. तिथं राज कपूर यांनी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन तयार होण्यास सांगितलं. यावर हेमा मालिनी तयार होण्यासाठी रूममध्ये गेल्या, पण बराच वेळ झाला, त्या बाहेर आल्याच नाहीत.
आता हेमा मालिनी एवढा वेळ आतमध्ये काय करत आहेत, हे तर पाहिलं पाहिजे. त्यासाठी खुद्द राज कपूर यांनीच हेमा मालिनी यांना बोलावण्यासाठी कुणाला तरी आत पाठवलं, पण जेव्हा त्यांना बोलवण्यासाठी गेले, तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये त्या नव्हत्याच. त्या मागच्या दरवाज्यातनं निसटल्या होत्या. हेमा मालिनी यांना हा रोल करायचाच नव्हता, हे राज कपूर यांना शेवटी समजलंच.
बास, मग काय, हेमा मालिनी यांनी हे पात्र साकारण्यास नकार देताच, हे पात्र आपल्या काळातील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेल्या झीनत अमान यांच्या झोळीत पडलं. हेमा मालिनी यांच्यानंतर झीनत अमान यांना हा सिनेमा ऑफर करण्यात आला. त्यावेळी राज कपूर झीनत अमान यांच्यासोबत ‘वकील बाबू’ सिनेमात काम करत होते. त्यावेळी झीनत अमान यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ या सिनेमासाठी होकार कळवला आणि इतिहासाच्या पानांमध्ये त्यांचं हे पात्र सामील झालं.
दिनांक22 मार्च, 1978साली रिलीझ झालेल्या या सिनेमानं त्यावेळी चिक्कार पैसा कमावला. 1978 साली 85 लाखात बनवलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जवळपास 4.5कोटी रुपयांची कमाई केली होती. जर 2020 च्या हिशोबानं पाहिलं, तर हीच कमाई तब्बल 105 कोटींच्या घरात जाते. अशाप्रकारे झीनत अमानच्या झोळीत हा सिनेमा पडला होता. (hema malini reject satyam shivam sundaram movie)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
हॅंडसम मुंडा! विकी कौशलचा स्टाईलीश अंदाज
बाबा सिद्दीकीच्या पार्टीत पलकच्या रिव्हिलिंग ड्रेसवर संतापले नेटकरी; म्हणाले, “तु इफ्तारसाठी आली की आयटम साँगसाठी?”