Saturday, March 15, 2025
Home मराठी विशाळगडाचे दर्शन घेतल्यानंंतर अभिनेते अजय पुरकर यांनी तमाम शिवभक्तांना केले खास आवाहन, व्हिडिओ होतोय व्हायरल

विशाळगडाचे दर्शन घेतल्यानंंतर अभिनेते अजय पुरकर यांनी तमाम शिवभक्तांना केले खास आवाहन, व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या मराठी सिनेजगतात अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. यामध्ये अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘पावनखिंड’ चित्रपटाचेही जोरदार कौतुक झाले होते. वीर बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये जोरदार यशस्वी ठरला होता. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) यांचेही प्रचंड कौतुक झाले होते. सध्या अजय पुरकर यांचा सोशल मीडियावरील व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओमधून त्यांनी शिवभक्तांना खास आवाहन केले आहे.

अजय पुरकर मराठी सिनेमांमधील एक लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. पावनखिंड चित्रपटातील त्यांनी साकारलेली बाजी प्रभूंची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या भूमिकेसाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि अभिनयात आणलेला जिवंतपणा हा सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला होता. त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाने सिनेमागृहात साक्षात बाजीप्रभू अवतरल्याचा भास निर्माण होत होता हेच त्यांच्या अभिनयाचे सर्वात मोठे यश होते. आपल्या ऐतिसाहिक भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते अजय पुरकर यांनी सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

काय आहे अजय पुरकर यांचे आवाहन :

“मी आणि माझी मुलगी सईविशाळगडाच्या दर्शनाला आलो आहोत. आम्ही नरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीजवळ उभे आहोत. यानिमित्ताने पावनखिंडीचंही दर्शन घडलं. महाराष्ट्र भूषण शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांची आज प्रकषार्ने जाणीव होतेय तसेच आठवण येत आहे. ते आज आपल्यामध्ये असते तर १०१ वर्षांचे असते. बाबासाहेब पुरंदरे यांनी नाटकामधून आमच्या रक्ताच्या धामण्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पसरवले. ते नाटक म्हणजे जाणता राजा. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशामध्ये देखील ‘जाणता राजा’चे असंख्य प्रयोग झाले. त्यामुळेच जगभरात पसरल्या गेलेल्या मराठी माणसांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कायमचे कोरले गेले.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Purkar (@ajay.purkar)

“श्री शिवराज अष्टकाद्वारे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आठ चित्रपट करत आहोत. आज एक आवाहन मला शिवभक्तांना आणि सर्व मराठी मनाच्या माणसांना करायचं आहे. ते आवाहन म्हणजे आपण असंख्य लोक दरवर्षी किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा पावनखिंडीचं दर्शन घेता. यावेळी इथे बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांची समाधी आहे. त्याचंही दर्शन नक्की घ्या. या वीररत्नांचं दर्शन घेऊन फार समाधान वाटेल. हेच आवाहन तुम्हा सगळ्यांना मी करत आहे. नक्की याचा विचार करा. पावनखिंडीचं दर्शन तसेच विशाळगडाचंही दर्शन आपल्याला घ्यायच आहे हे ध्यानात ठेवा हरहर महादेव,” असे आवाहन त्यांनी या व्हिडिओमधून केले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा –

जणू लाल परीच! सई लोकूरचे नवीन फोटो चर्चेत

चंकी पांडेच्या लेकीला ‘सपाट छातीवाली’ म्हणत ट्रोल करायचे लोक, वेदना सांगताना हळहळली अभिनेत्री

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर एका वर्षातच शहनाज गिल झाली लग्नाला तयार, ‘या’ आहेत अटी

हे देखील वाचा