Thursday, April 24, 2025
Home टेलिव्हिजन श्रद्धा आर्याने केला लव्ह लाईफचा खुलासा, पतीच्या ‘त्या’ गोष्टीत अडकलाय अभिनेत्रीचा जीव

श्रद्धा आर्याने केला लव्ह लाईफचा खुलासा, पतीच्या ‘त्या’ गोष्टीत अडकलाय अभिनेत्रीचा जीव

टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा आर्या (shraddha aarya) सध्या तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात खूप चांगल्या टप्प्यावर आहे. एकीकडे तिला नुकतीच करण जोहरच्या चित्रपटात एन्ट्री मिळाली आहे, तर दुसरीकडे ती आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये, १६ नोव्हेंबरला श्रद्धा आर्याने तिचा बॉयफ्रेंड राहुल नागलसोबत सात फेरे घेतले. त्यादरम्यान, श्रद्धाने एका मुलाखतीत असेही सांगितले होते की, राहुल आणि ती दीर्घकाळ विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यामागचे कारण म्हणजे श्रद्धाचा पती राहुल नौदलात अधिकारी आहे. मात्र, जेव्हा-जेव्हा श्रद्धा आणि राहुलला वेळ मिळतो तेव्हा ते नक्कीच एकत्र वेळ घालवतात.

श्रद्धा आणि राहुल फार काळ एकत्र राहत नाहीत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही, पण दोघांमध्ये खूप प्रेम आहे. श्रद्धा सोशल मीडियावर वेळोवेळी याची झलक शेअर करत असते. एका मुलाखतीदरम्यान श्रद्धा आर्याने तिच्या राहुल नागलच्या प्रेमकथेबद्दल खुलेपणाने सांगितले. तसे, श्रद्धाला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलणे अजिबात आकुंडली भाग्य या अभिनेत्रीने असेही सांगितले की, तिला इतक्या लवकर लग्न होईल याची कल्पना नव्हती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha Arya (@sarya12)

मुलाखतीत श्रद्धाने सांगितले की, ती सुमारे एक वर्ष राहुलसोबत रिलेशनशिपमध्ये होती, मात्र त्यादरम्यान दोघांनी लग्नाचा अजिबात विचार केला नव्हता. श्रद्धाने असेही सांगितले होते की, ती पहिल्यांदा राहुलच्या नाही तर त्याच्या वर्दीच्या प्रेमात पडली होती. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून राहुलला भेटल्याचे अभिनेत्रीने सांगितले होते.वडत नाही. मात्र मुलाखतीत श्रद्धाने राहुलसोबत लग्न करण्याचा निर्णय अतिशय घाईघाईने घेतल्याचे सांगितले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha Arya (@sarya12)

श्रद्धा आर्याने सांगितले की, तिचा नवरा त्यावेळी मुंबईत राहत होता. दोघांचे शेड्युल खूप व्यस्त असायचे, पण प्रत्येक प्रसंगात ते एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न करायचे. यादरम्यान राहुलची पोस्टिंग दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाली तेव्हा दोघांनाही त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली. त्यानंतर राहुल आणि श्रद्धाने या नात्याला लग्नाचे नाव देण्याचा विचार केला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

सुभाष बी यांच्यावर दुःखाचा डोंगर: अर्ध्यात साथ सोडून पत्नी देवाघरी, आजारपणात सलमानने केली होती मदत

प्रेग्नेंट आलिया म्हणतीये, ‘मला आणखी १०० वर्ष काम करायचे आहे…’

समंथापासून वेगळे झाल्यावर नागा चैतन्यला झाली नव्या प्रेमाची जाणीव, ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात आहे चैतन्य

हे देखील वाचा