मराठी कलाविश्वातून प्रेक्षकांना सुखद धक्का देणारी बातमी समोर येत आहे. ही बातमी ‘बिग बॉस मराठी’ या रियॅलिटी शोमध्ये झळकलेला प्रसिद्ध अभिनेता अविष्कार दारव्हेकर याच्याविषयी आहे. अभिनेता अविष्कार हा दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. या गोष्टीवरून पडदा उठवण्यासाठी त्याने सोशल मीडियावरून काही फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. तो लग्नबंधनात अडकल्याने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मराठी अभिनेता अविष्कार दारव्हेकर (Avishkar Darvekar) हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मात्र, यावेळी तो चर्चेत आला, त्याच्या लग्नामुळे. अविष्कारने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही फोटो शेअर केले आहेत. अविष्कारने शेअर केलेल्या फोटोत त्याची दुसरी पत्नीही दिसत आहे. हे जोडपे बर्फाळ प्रदेशात फिरायला गेले असल्याचे दिसत आहेत. आता सर्वत्र या जोडप्याच्या फोटोचीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर तर त्यांचे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत.
अविष्कारची पोस्ट
अविष्कारने त्याचे फोटो शेअर करत शानदार कॅप्शनही दिले आहे. त्याने त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद. खूप प्रेम. तुमच्या शुभेच्छा मला दररोज आणखी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी मदत करतात.” अविष्कारच्या या फोटोंवरून असे म्हटले जात आहे की, त्याने दुसऱ्यांदा लग्न केले आहे. मात्र, त्याच्या पत्नीविषयी अधिक माहिती समोर आली नाहीये.
View this post on Instagram
अविष्कारच्या या पोस्टला चाहत्यांसोबतच कलाकारही लाईक करत आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता हार्दिक जोशी यानेही अविष्कारची ही पोस्ट लाईक केली आहे. तसेच, एका चाहतीने कमेंट करत लिहिले आहे की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा अविष्कार. तुझे लग्न झाल्याचे पाहून छान वाटले.” अनेक चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, खरंच त्याचे लग्न झाले आहे की नाही. त्यामुळे ते प्रश्न विचारत आहेत. एका चाहतीने म्हटले की, “कधी झाले?”, दुसऱ्या एकीने कमेंट करत लिहिले की, “लग्न?”
अविष्कारची पहिली पत्नी
अविष्कार याचे हे दुसरे लग्न आहे. तो यापूर्वीही लग्नबंधनात अडकला होता. त्याने अभिनेत्री स्नेहा वाघ (Sneha Wagh) हिच्यासोबत लग्न केले होते. विशेष म्हणजे, जेव्हा त्याने स्नेहासोबत लग्न केले, तेव्हा ती फक्त १९ वर्षांची होती. मात्र, त्यांच्या संसाराला फार काळ सुख लाभले नाही. त्यांच्या नात्यातील कटुतेमुळे त्या दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अर्रर्र! नागार्जुनाच्या लेकाला पोलिसांनी घेतलेलं ताब्यात, गाडीमध्ये गर्लफ्रेंडसोबत करत होता ‘हे’ कृत्य
ठरलं रे! ‘बिग बॉस मराठी ४’ शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ‘या’ दिग्गज व्यक्तीच्या खांद्यावर
बॉयफ्रेंड असावा तर असा! तेजस्वीने डोकं फोडून घेतल्यानंतर करणने ‘अशी’ घेतली काळजी, व्हिडिओ व्हायरल