Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूड अभिनेता आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला, दोन तास चर्चा झाल्याची माहिती

बॉलिवूड अभिनेता आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला, दोन तास चर्चा झाल्याची माहिती

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा लालसिंग चड्ढा चित्रपट चांगलाच सुपफ्लॉप ठरला आहे. चित्रपटाला देशभरात होणारा विरोधांमुळे आमिर खानचा हा बहिचर्चित चित्रपट चांगलाच आपटला असून आमिर खानला मोठा धक्का बसला आहे. अशातच अभिनेता आमिर खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाला वाढता विरोध पाहता राज ठाकरे यांची भेट घेतल्याने लोकांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, आमिर खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि भूमिकांनी त्याने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या आमिर खानच्या लालसिंग चड्ढा चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू असून चित्रपट हिंदूविरोधी असल्याचे कारण सांगत देशभरात या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी होताना दिसत आहे. यामुळेच आमिर खानचा लालसिंग चड्ढा चित्रपट फ्लॉप ठरला आहे.

अशातच अभिनेता आमिर खानने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या भेटीचे कारण अद्याप समोर आले नसले तरी सध्य़ाची स्थिती पाहता त्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.

हेही वाचा –

लालसिंग चड्ढा सुपरफ्लॉप, पण ‘हे’ चित्रपट घालणार बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

अभिनेत्री शहनाज गिल पुन्हा प्रेमात! ‘या’ लोकप्रिय कोरिओग्राफरला करतेय डेट

‘मला संपवायला निघालेल्यांचा सुफडासाफ झाला’, अभिनेते किरण माने यांची पोस्ट चर्चेत

हे देखील वाचा