Thursday, January 22, 2026
Home अन्य बलात्कार पिडितेच्या अन्यायाची कहाणी, ‘सिया’ चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टिझर एकदा पाहाच

बलात्कार पिडितेच्या अन्यायाची कहाणी, ‘सिया’ चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टिझर एकदा पाहाच

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक नाविण्यपूर्ण विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये अनेक चित्रपटांच्या कथा या सत्य घटनेवर आधारित आहेत ज्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळत आहे. असाच आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्याच्या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. सिया नावाचा हा चित्रपट भारतातील महिला अत्याचारावर उघडपणे भाष्य करणारा आहे, ज्याचा अंगावर शहारे आणणारा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

‘सिया’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे आणि आज बुधवारी चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला. मनीष मुंद्रा दिग्दर्शित, हा चित्रपट भारतातील आणखी एक प्रामाणिक कथा आहे, जी नवीन वादविवादाला सुरुवात करेल. सियाचा टीझर हिंसाचार आणि बलात्काराला बळी पडलेल्या असंख्य पीडितांच्या वेदनांची कहाणी सांगतो. सियाचा टीझर खूपच वेदनादायक आहे, ‘सिया’ची दुर्दशा पाहून लोक दया दाखवू शकतात.

‘दृश्यम फिल्म्स’ निर्मित, ‘मसान’ आणि ‘न्यूटन’चे निर्माते आता त्यांच्या प्रेक्षकांसाठी ‘सिया’ घेऊन येत आहेत ज्यात भारताची वेदनादायक कथा दाखवण्यात येणार आहे. पूजा पांडे आणि विनीत कुमार सिंग सारखे यशस्वी प्रतिभावान कलाकार या चित्रपटात दिसत आहेत. ही एका छोट्या शहरातील मुलीची कथा आहे जी सर्व अडचणींना तोंड देत न्यायासाठी लढण्याचा निर्णय घेते आणि दुष्ट पुरुष वर्चस्व व्यवस्थेविरुद्ध चळवळ सुरू करते.दृष्यम फिल्म्स निर्मित, मनीष मुंद्रा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 16 सप्टेंबर 2022 रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर सर्वत्र चर्चेत आला आहे.

हेही वाचा –फक्त बॉलिवूडचं नव्हे, ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटांवरही बसला सुपरफ्लॉपचा शिक्का

राहत फतेह अली खान यांचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

‘आता आम्ही शांत बसणार नाही’, बॉलिवूड चित्रपटांना बॉयकॉट करण्याच्या मागणीवर दिग्गज अभिनेत्याने दिला इशारा

हे देखील वाचा