मनोरंजन जगतातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. गेल्या एक महिन्यापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव (Raju shrivastav) यांनी आज अखेर शेवटचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्याने मनोरंजन जगताला मोठा दुःखद धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेकजण त्यांचे फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

जिममध्ये व्यायाम करताना राजू यांना कार्डियाक अटॅक त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. डॉक्टरांनी देखील त्यांची संपूर्ण काळजी घेतली. परंतु एवढ्या मोठ्या आजारावर राजू यांना तग धरणे शक्य झाले नाही आणि उपचारदारम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांचे पत्नी आणि दोन मुले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी सर्वांना विनंती करते…’ राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीची भावुक प्रतिक्रिया समोर
‘मित्रांनो राजूसाठी प्रार्थना करा, त्याचा मेंदू…’, कॉमेडियन सुनील पालने दिली धक्कादायक माहिती
आपल्या विनोदाने खळखळून हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांची ह्रदयस्पर्शी लवस्टोरी, तब्बल १२ वर्ष पाहिली होती वाट










