मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता असलेल्या अभिनेता विशाल निकमच्या (Vishal Nikam) मनात सध्या कुणीतरी घर केलंय… त्याच्या मनातील ती व्यक्ती कोण हे लवकरच त्याच्या चाहत्यांना समजणार आहे. ‘तू संग मेरे’ असं म्हणत त्याने आपल्या प्रेमाची खुलेआम कबुली दिली आहे. व्हिडीओ पॅलेसची निर्मीती असलेल्या ‘तू संग मेरे’ या हिंदी रोमँटिक अल्बममध्ये विशाल झळकणार आहे. त्यासोबत दिसणार आहे सुंदर, गुणी अभिनेत्री दिशा परदेशी.
‘तू संग मेरे रंग भरे… कहने दे जो दिल ये कहे…
हाथ ये तेरा हाथ में… मेरे साथ ये ऐसा रहे…
असे बोल असलेल्या या गीतातून त्याची दिशा सोबतची ‘प्यारवाली’ केमिस्ट्री दिसणार आहे. रोहितराज कांबळे याने लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला हर्षवर्धन वावरे याने स्वरबद्ध केले आहे. काश्मीरच्या नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत झालेल्या या गाण्याचे दिग्दर्शन फुलवा खामकर हिने केले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे.
आपल्या पहिल्या हिंदी अल्बमविषयी विशाल सांगतो,‘या हिंदी गाण्यासाठी व्हिडीओ पॅलेसने मला दिलेली ही संधी खूप महत्त्वाची आहे. अभिनेत्री दिशा परदेशी सांगते की, वेगळा अनुभव याशूट दरम्यान मी घेतला. आमची लव्हेबल जोडी आणि हे रोमँटिक गाणं सर्वांना नक्कीच आवडेल.
दरम्यान, विशाल निकमने बिग बॉस मराठीमधून घराघरात लोकप्रियता मिळवली होती. तो सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतो. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तो नेहमीच विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. विशालच्या चाहत्यांना त्याच्या या गाण्याची आता जोरदार उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा –
पन्नाशी पार केलेल्या अरबाजची ३० वर्षीय गर्लफ्रेंड आहे खूपच बोल्ड, व्हिडिओचा इंटरनेटवर नुसता धुमाकूळ
सस्पेंन्स, थ्रिलर आणि भयानक हत्येचा थरार, अक्षय कुमारच्या ‘कठपुतली’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
व्हायरल व्हिडिओनंतर करणसिंग ग्रोवर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; म्हणाले, ‘तो बायकोच्या जिवावर जगतो…’