Wednesday, December 3, 2025
Home साऊथ सिनेमा काय सांगता! विजयचे होते ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींवर क्रश, दोघींनीही सलमानसोबत केला होता रोमान्स

काय सांगता! विजयचे होते ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींवर क्रश, दोघींनीही सलमानसोबत केला होता रोमान्स

आपण पाहतो की, एखाद्या मुलाचे एखाद्या मुलीवर क्रश असते, किंवा मुलीचे मुलावर क्रश असते. या गोष्टी कलाविश्वातही पाहायला मिळतात. अभिनेत्यांना अभिनेत्री आवडत असतात, तर अभिनेत्रींनाही अभिनेते आवडत असतात. यामध्ये साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा जो लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार आहे, याचाही समावेश होतो. विजयचे बॉलिवूडमधील दोन अभिनेत्रींवर क्रश होते. विशेष म्हणजे, या दोन्ही अभिनेत्रींनी सलमान खान याच्यासोबत काम केले आहे. याचा खुलासा त्याने ‘डान्स इंडिया डान्स सुपरमॉम’ या शोमध्ये केला.

अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हे दोन्ही कलाकार त्यांच्या ‘लायगर’ (Liger) या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यांनी ‘डान्स इंडिया डान्स सुपरमॉम’ या शोमध्ये हजेरी लावली. यादरम्यान त्याने त्याच्या खऱ्या आयुष्यातील सिक्रेट क्रश असलेल्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आणि भाग्यश्री (Bhagyashree) यांच्याबद्दलही खुलासा करत सर्वांना चकित केले. विशेष म्हणजे, या दोन्ही अभिनेत्री डीआयडी सुपरमॉम या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहेत.

काय म्हणाला विजय?
विजयने त्याच्या मनात दडलेली गोष्ट सांगत म्हटले की, “मी उर्मिला मॅम आणि भाग्यश्री मॅम यांचा खूप मोठा फॅन आहे. मी आजपर्यंत त्यांचे सर्व सिनेमे पाहिले आहेत. जेव्हा मी तरुण होतो, तेव्हा माझे उर्मिला मॅम आणि भाग्यश्री मॅम यांच्यावर क्रश होते. आताही माझे त्यांच्यावर थोडे थोडे क्रश नक्कीच आहे.”

विजयने सांगितली रंजक गोष्ट
रेमो डिसूझाबद्दलही विजयने रंजक गोष्ट सांगितली. त्याने हेही सांगितले की, त्याचे उर्मिला आणि भाग्यश्रीवर क्रश आहेच, पण तो रेमोचादेखील खूप मोठा चाहता आहे. त्याने सांगितले की, “मी रेमो सरांच्या कामाचा खूप मोठा चाहता आहे. विशेषत: बदतमीज दिलवरील त्यांची कोरिओग्राफी मला खूप आवडली. जेव्हा मी हे गाणे पहिल्यांदा पाहिले होते, तेव्हा मी विचार केला होता की, मला या व्यक्तीशी भेटले पाहिजे, ज्याने हे गाणे कोरिओग्राफ केले आहे.”

सलमान खानसोबत झळकल्यात दोन्ही अभिनेत्री
अभिनेत्री भाग्यश्रीने सलमान खान (Salman Khan) याच्यासोबत ‘मैंने प्यार किया’ या सिनेमात काम केले आहे. तसेच, उर्मिला मातोंडकर हिने ‘जानम समझा करो’ या सिनेमात काम केले आहे.

चांगलाच नाचला विजय देवरकोंडा
विजयने त्याच्यापुढे परफॉर्म करणाऱ्या प्रत्येक आईचे प्रोत्साहन वाढवले. इतकेच नाही, तर सर्वांसोबत विजयनेही या मंचावर ठुमके लावले. एपिसोड प्रदर्शित होण्यापूर्वीच यामधील विजयचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्याचे चाहते या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे, अभिनेता विजयचा ‘लायगर’ हा आगामी सिनेमा २५ ऑगस्ट रोजी सर्व भारतात प्रदर्शित होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
फॅन्सला चकवण्यासाठी ‘विरुष्का’ने शोधली आयडिया, पण शेवटी चाहत्यांनीही दिला ‘धप्पा’
रणबीरशी लग्न करून ४ महिने होताच, आलिया घेणार ‘हा’ मोठा निर्णय; कशी असेल सासूबाईंची रिऍक्शन?
बॉक्स ऑफिसवर गटांगळ्या खाणाऱ्या सिनेमांवर स्पष्टच बोलला अक्षय कुमार; म्हणाला, ‘सगळी चूक माझीच’

हे देखील वाचा