मराठी अभिनेत्री सायली संजीव हिने नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सायली पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे. तिने मरून रंगाचा ड्रेस परिधान केलाय.
यातील काही फोटोंमध्ये तिने कानात फूल लावलेले दिसत आहे. तसेच, तिच्या चेहऱ्यावरील गोड हसू चाहत्यांचे लक्ष वेधतेय.
सायलीबद्दल बोलायचं झालं, तर तिचा जन्म ३१ जानेवारी, १९९३ रोजी धुळ्यात झाला आहे.
तिने सन २०१६मध्ये 'पोलीस लाईन- एक पूर्ण सत्य' या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.
ती शेवटची २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा' या सिनेमात झळकली होती.