Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड दाऊदची एक्स गर्लफ्रेंड बॉयकॉट ट्रेंडवर बरळली; म्हणाली, ‘या सगळ्याला कारणीभूत बॉलिवूड कलाकारांचा राग’

दाऊदची एक्स गर्लफ्रेंड बॉयकॉट ट्रेंडवर बरळली; म्हणाली, ‘या सगळ्याला कारणीभूत बॉलिवूड कलाकारांचा राग’

बॉलिवूडमध्ये सध्या बॉयकॉटचे वारे वाहत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, सुपरस्टार अक्षय कुमार याच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या सिनेमापासून सुरू झालेला हा ट्रेंड आता ‘ब्रह्मास्त्र‘ या सिनेमापर्यंत जाऊन पोहोचलाय. या ट्रेंडमुळे बॉलिवूड कलाकारांची प्रतिमा मलीन केली आहे. शिवाय, त्यांच्या सिनेमाच्या कमाईचीही मोठी पडझड झालीये. इंडस्ट्रीची अशी दशा पाहून २५ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणारी अभिनेत्री मंदाकिनी संतापलीये. ती म्हणाली की, बॉयकॉट हा ट्रेंड कलाकारांच्या रागामुळे सुरू झालाय.

माध्यमांशी बोलताना दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याची एक्स गर्लफ्रेंड असलेली अभिनेत्री मंदाकिनी (Mandakini) हिने बॉयकॉटवर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, “या सर्व गोष्टी पाहून खूप दु:ख होते. आमच्या काळात अशी संस्कृती नव्हती, तेव्हा दिग्दर्शकांना गुरूच्या नजरेतून पाहिले जायचे. आम्ही सर्व अभिनेत्यांनी त्यांचा आदर केला. आता इंडस्ट्रीत ते आपलेपण राहिले नाही. कदाचित त्यामुळेच आज इंडस्ट्रीतील लोक एकमेकांवर आरोपांचा वर्षाव करत असतात.”

पुढे बोलताना मंदाकिनी म्हणाली की, “आता लोकांमध्ये अहंकाराची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळेच हा उद्योग चालत असल्याची कलाकारांची भावना आहे. कलाकारांमध्ये अहंकार नसावा असे माझे मत आहे. माणूस जितक्या उंचीवर असेल, तितका तो नम्र असावा. खरं तर, आमचे प्रेक्षक आम्हाला पाहतात, आमच्यावर प्रेम करतात, आमचे अनुसरण करतात. अशा स्थितीत ते जेव्हा तुमचा अहंकार पाहतात, तेव्हा त्यांना राग येतो. बहिष्कार आणि रद्द संस्कृती हा याच संतापाचा परिणाम आहे.”

“याला आणखी एक पैलू देखील आहे. कदाचित इंडस्ट्रीतील लोक या संस्कृतीला चालना देत असतील. होय, मला असे वाटते की, हे सर्व एका योजनेखाली घडत आहे. सरकार आणि इंडस्ट्रीतील लोक मिळून ही संस्कृती विकसित करत आहेत. एकमेकांबद्दल बोलणाऱ्या इंडस्ट्रीतल्या लोकांना कोणीतरी शिकवून उभे करत असल्याची मला शंका आहे. आता प्रत्येक गोष्टीत अप्रामाणिकपणा आहे,” असेही मंदाकिनी पुढे म्हणाली.

मंदाकिनीची सिने कारकीर्द
अभिनेत्री मंदाकिनी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मंदाकिनी हिने सन १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. या सिनेमातून तिने कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत तिने ४८ सिनेमात काम केले आहे. मंदाकिनीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर तिचे दाऊद इब्राहिमसोबत नाव जोडले गेले होते. तिचे आणि दाऊदचे दुबईतील फोटो व्हायरल झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
कानात फूल, चेहऱ्यावर गोड हसू; सायलीच्या मनमोहक फोटोंची सर्वांना भुरळ
चाहत्यांसाठी खुशखबर! कार्तिक आर्यन आणि रश्मिकाची जोडी करणार एकत्र काम
फरहान शिबानी होणार आई बाबा? व्हायरल फोटोमुळे रंगली चर्चा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा