Tuesday, January 14, 2025
Home टेलिव्हिजन आधी बला’त्कार, नंतर हत्या? सोनालीच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासे, खुनाचा गुन्हा दाखल

आधी बला’त्कार, नंतर हत्या? सोनालीच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासे, खुनाचा गुन्हा दाखल

सोमवारी (दि. २२ ऑगस्ट) टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट हिचे निधन झाले होते. तिच्या निधनानंतर कलाविश्वावर शोककळा पसरली होती. सोनालीच्या निधनानंतर आता तिच्या पोस्टमार्टम (शवविच्छेदन) रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. असे म्हटले जात आहे की, सोनालीच्या मृतदेहावर जखमांचे निशाण मिळालेत. रिपोर्टनुसार, ही जखम कोणत्यातरी मजबूत वस्तूमुळे लागली असावी.

सोनाली फोगाट (Sonali Phogat) हिच्या मृत्यूप्रकरणी आयजीपी ओएस बिश्नोई यांनी सांगितले की, अंजुना पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सोनालीच्या भावाने तिच्या पीए आणि आणखी एका व्यक्तीचा यामागे हात असल्याचा उल्लेख केला आहे. १-२ तासात संपूर्ण पोस्टमार्टम रिपोर्ट समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुरुवारी (दि. २५ ऑगस्ट) अभिनेत्रीचे पार्थिव शरीर दिल्लीत पोहोचणार आहे. त्यांनी सांगितले की, सोनालीच्या शरीराचा तपास करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना शरीरावर कोणत्याही धारदार जखम मिळाली नाहीये.

भाऊ रिंकूने मृत्यूवर संशय केला व्यक्त
सोनाली फोगाट हिचा भाऊ रिंकू याने सांगितले की, “तिची गोव्याला जाण्याची कोणतीही योजना नव्हती. तिच्या हत्येसाठीच तिला गोव्यात आणण्यात आले. सोनाली गोव्याला जाणार असल्याची माहिती कुटुंबीयांना नव्हती. सिनेमाच्या शूटिंगसाठी येणाऱ्या प्रकरणाची आम्ही तपासणी केली, तेव्हा समजले की, येथे शूटिंगच झाली नाही. इथे एकही कलाकार नव्हता.”

‘उच्चस्तरीय तपास झाला पाहिजे’
या प्रकरणात हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी म्हटले की, “सोनाली फोगाट हिचे कुटुंबीय खूपच गंभीर आरोप लावत आहेत. त्याचा उच्चस्तरीय तपास झाला पाहिजे, जेणेकरून सत्य समोर येईल. गोवा सरकारने तपास केला पाहिजे.”

सोनालीच्या वहिनीने केले होते गंभीर आरोप
सोनाली हिची वहिनी अंजनाने आरोप लावला होता की, “घटनेच्या दिवशी सायंकाळी सोनालीच्या मोबाईलवर फोन केला होता. तो फोन तिचा पीए सुधीरने उचलला. फोन उचलल्यानंतर मी म्हणाले की, बाहेर किती चांगले वातावरण आहे, तेव्हा सुधीर म्हणालेला की, ‘मी आताच उठलो आहे आणि आम्ही मुंबईत आहोत.'”

“त्यावेळी मला समजले की, सोनाली मुंबईत आहे. सकाळी सोनालीचे निधन झाल्याचे समजताच मी अनेकदा सुधीरला फोन केला. मात्र, त्याने फोन उचलला नाही. जेव्हा फोन उचलला, तेव्हा त्याने सांगितले की, रात्री शूटिंगमुळे मुंबईहून गोव्याला आलो होतो,” असे पुढे बोलताना ती म्हणाली. तिने सांगितले की, गोवा पोलिसांनी तपास केल्यानंतर समजेल की, ते मुंबईत होते की, नाही.

अजून झाले नाही पोस्टमार्टम
याप्रकरणी प्राथमिक कारवाईचा भाग म्हणून गोवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. तिचे कुटुंबीय गोव्यात आहेत. सोनालीच्या मृत्यूच्या घटनेला ४८ तासांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, तिच्या मृतदेहाचे पोस्ट मार्टमही झालेले नाही. मात्र, गोवा सरकार अजूनही सोनालीच्या मृत्यूला सामान्य मृत्यू मानत आहे. गोवा सरकार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तयार असल्याचे सांगत आहे, जेणेकरून मृत्यूचे सत्य बाहेर येऊ शकेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
बॉलिवूडवर शोककळा! हिट सिनेमे देणारा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, हार्ट अटॅकने घेतला जीव
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! ‘गँग्स ऑफ वासेपूर’ फेम अभिनेत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
‘हे’ कलाकार कधीच चढणार नाही ‘कॉफी विद करण’चा उंबरा, कारण आहे खूपच गंभीर

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा