बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटावर प्रदर्शनाच्या आधीपासूनच बहिष्कार घालण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू होती. त्यामुळेच बॉयकॉट लालसिंग चड्ढा हा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु झाला होता. या बहिष्काराचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झाला. त्यामुळेच हा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र असे असले तरी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र चित्रपटाचे कौतुक केले होते. ज्यामुळे त्यांना जोरदार ट्रोल केले गेले.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेता आमिर खानचा लालसिंग चड्ढा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती. या बॉयकॉट ट्रेंडवर अनेक कलाकारांनी तसेच राजकीय नेत्यांनी मत व्यक्त केले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही चित्रपटाचे कौतुक केले होते. परंतु हे कौतुक करताना त्यांच्याकडून आकडेवारीत चुक झाल्याने त्यांच्यावर ट्विट डिलीट करण्याची नामुष्की ओढावली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये लालसिंग चड्ढा चित्रपटाचे कौतुक करताना “भक्तांनी डोक्यावर घेतलेल्या काश्मीर फाईल्सपेक्षा त्यांनी बहिष्कार घातलेल्या लालसिंग चड्ढाने जास्त पैसा कमावला. 7.5 दशलक्ष डॉलर, म्हणजे साधारण 6 हजार कोटी रुपये, भक्तांच्या मताला फारशी किंमत राहिलेली नाही, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे,” अशी माहिती दिली होती. मात्र त्यांच्या या ट्विटवर निशाणा साधताना नेटकऱ्यांनी ७.५ दशलक्ष म्हणजे ६००० कोटी नव्हेतर ६० कोटी होतात. आणि बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी चित्रपटानेही इतकी कमाई केली नाही अशा शब्दात ट्रोल केले होते.
या ट्रोलिंगनंतर आणि त्यांची चुक लक्षात आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले. मात्र त्यांच्या या ट्विटची माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.
हेही वाचा – पतीच्या निधनानंतर लहान मुलाला सोडून दुसरं लग्न करणार मेघना राज? सत्य आले समोर
बिग बॉसने वाचवले रुबीना आणि अभिनवचे नाते, अशी झालेली प्रेमकहाणीला सुरुवात
अजय देवगणची लेक बनून इशिता दत्ताने मिळवली ओळख, टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत कमावले नाव










