Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सोनाली फोगाटच्या समर्थनार्थ सरसावले ‘हे’ कलाकार, सखोल चौकशीची केली मागणी

लोकप्रिय टिकटॉक स्टार आणि भाजपा नेता सोनाली फोगाटच्या (Sonali Phogat) मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सोनाली फोगाटचा 22 ऑगस्ट रोजी गोव्यामध्ये ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र तिच्या मृत्यूबद्दल रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. त्यामुळेच हा आकस्मित मृत्यू की घातपात अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.अशातच आता अभिनेत्रीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी बिग बॉस १४ मधील स्पर्धकांनी केली आहे. त्यासाठी तिच्या मदतीसाठी अनेकजण धावून आले आहेत.

सोनालीच्या समर्थनार्थ बिग बॉसमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरुन आवाज उठवला आहे. यामध्ये राहुल वैद्य, विंदु दारा सिंग, अली गोणी यांनी ट्विट करत अभिनेत्रीच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त केली आहे. तसेच सखोल चौकशीचीही मागणी केली आहे.

हेही वाचा – आमिर खान अडचणीत! ‘लालसिंग चड्ढा’च्या अपयशानंतर गमावला बिग बजेट चित्रपट
लग्नात गाणे गाऊन मुकेश यांना मिळाली चित्रपटात गाण्याची पहिली संधी, मोतीलाल यांनी दिली दिशा
‘टॉलिवूड स्टोरी विकते तर बॉलिवूड स्टार्स विकते’, अभिनेते अनुपम खेर यांचे वक्तव्य चर्चेत

हे देखील वाचा