Wednesday, January 21, 2026
Home साऊथ सिनेमा कौतुकास्पद! दिवंगत अभिनेता पुनित राजकुमारचे दिले उपग्रहाला नाव

कौतुकास्पद! दिवंगत अभिनेता पुनित राजकुमारचे दिले उपग्रहाला नाव

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar)आता आपल्यात नाहीत. या अभिनेत्याला काही काळ लोटला असला तरी हा अभिनेता आजही त्याच्या चाहत्यांमध्ये उपस्थित आहे. अभिनेत्याच्या स्मरणार्थ त्याचे चाहते अनेकदा काहीतरी करताना दिसतात. दरम्यान, आता अभिनेत्याशी संबंधित एक नवीन बातमी समोर आली आहे. पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली म्हणून नुकतेच पुनीत नावाचा उपग्रह श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केला जाणार आहे.

याबाबत माध्यमांना माहिती देताना, विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री सीएन अस्वंत नारायण म्हणाले, “बंगळुरूमधील सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी 1.90 कोटी रुपये खर्चून KGS3 उपग्रह विकसित केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निधन झालेल्या दिवंगत अभिनेत्या पुनीत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या उपग्रहाचे नाव ठेवले आहे.” 15 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, हा उपक्रम आझादीच्या अमृत महोत्सवाचा एक भाग आहे. सरकारच्या उपक्रमांतर्गत, राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयांमधून 1000 विद्यार्थी निवडले जातील, ज्यांना श्रीहरिकोटाला भेट देण्याची आणि उपग्रह पुनीतच्या प्रक्षेपणाचे साक्षीदार होण्याची संधी मिळेल. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

यापूर्वी पुनीतला नुकतीच म्हैसूर विद्यापीठाने मरणोत्तर डॉक्टरेट बहाल केली होती. विशेष म्हणजे, कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे 29 ऑक्टोबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लकी मॅन हा त्याचा शेवटचा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
अनन्या पांडे आणि तारा सुतारियाची मारामारी? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
कुणालच्या पार्टीत जान्हवीचा राडा, डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल
कोरोनाने केलेत बिग बिंचे हाल! पोस्ट शेअर करत मांडली व्यथा

हे देखील वाचा