दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रितू वर्मा. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींपैकी रितू ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. एका शेफपासून ते एका चोरापर्यंत अनेक भूमिका निभावून तिने प्रेक्षकांच्या मनात तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे. तिच्या प्रत्येक रोलमध्ये तिच्या अनेक पैलूंचा अंदाज प्रेक्षकांना आला आहे. रितूचा जन्म 10 मार्च 1990 मध्ये हैद्राबादमध्ये झाला. तिने अनेक शॉर्टफिल्म आणि सहायक अभिनेत्रीची पात्र निभावल्यानंतर ‘पेली चुपुलू’ या तेलगू चित्रपटात मुख्य भूमिका निभावली. यासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले. आपल्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री रितू वर्माने गेल्याच आठवड्यात आपला ३१वा वाढदिवस साजरा केला.
खरं पाहायला गेलं तर रितू ही पेश्यानी इंजिनियर आहे. तिला सगळे ‘ब्युटी विथ ब्रेन’ असं म्हणतात. कॉलेजमध्ये असताना तिला फॅशन आणि अक्टिंगमध्ये भाग घ्यायला खूपच आवडत असे. मोठ्या पडद्यावर येण्याआधी तिने अनेक शॉर्टफिल्ममध्ये काम केले होते.
‘बादशहा’ या चित्रपटात ‘काजल आग्रवाल’ हिच्या मैत्रिणीचे पात्र निभावून तीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘येवडे सुब्रमण्यम’ या रियाच्या भूमिकेसाठी आयफामध्ये तिला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीसाठी पुरस्कार मिळाला होता. तिचा फिल्मफेअर पुरस्काराबद्दल सगळ्यांना माहीत असेल पण आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल अगदी निवडक व्यक्तींनाच कल्पना असेल. तिला ‘अनुकोकुंदा’ या चित्रपटासाठी 48 HR फील प्रोजेक्ट फेस्टिवल आणि कॅनस फिल्म फेस्टीवल 2013 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
रितूला अभिनयासोबत ट्रॅवेलिंग आणि स्पोर्ट्समध्ये देखील रस आहे. तिला खास करून क्रिकेट बघायला खूप आवडते. ती ‘आईपीएल’मध्ये ‘चेन्नई सुपर किंग’ या टीमला सपोर्ट करते. तसेच तिला पेंटिंग करायला देखील खूप आवडते. तिच्या या कलेचा अनुभव लॉकडाऊन दरम्यान सगळ्यांना आला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-साठच्या दशकातील ‘चॉकलेट हिरो’, ज्याचे संपूर्ण कुटुंब होते चित्रपट उद्योगात
-तबला वादनासोबतच चित्रपटात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे उस्ताद ‘झाकीर हुसेन’