बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची लोकप्रियता जगभरात आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक तासंनतास थांबायला तयार असतात. मात्र आता अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रियतेची झलक अमेरिकेत पाहायला मिळाली आहे. वास्तविक, न्यू जर्सीच्या एडिसन शहरात राहणाऱ्या एका भारतीय अमेरिकन कुटुंबाने त्यांच्या घरी अमिताभ बच्चन यांचा पुतळा बसवला आहे. या दरम्यान एक भव्य उत्सव देखील आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये नेता अल्बर्ट जसानी देखील सहभागी झाले होते.
एडिसनमधील भारतीय सुपरस्टार्सच्या फॅन क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला होता. दरम्यान, येथे राहणाऱ्या रिंकू आणि गोपी सेठ यांनी त्यांच्या घराबाहेर अमिताभ बच्चन यांचा पुतळा बसवला. या प्रसंगी सुमारे 600 लोक जमले, ज्यांना लिटल इंडिया म्हटले जाते. यावेळी सर्वांनी खूप धमाल केली. लोक फटाके फोडताना, नाचताना दिसले. यावेळी अमिताभ बच्चन यांचा पुतळा एका मोठ्या काचेच्या पेटीत ठेवण्यात आला होता. या पुतळ्यात अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’च्या पोझमध्ये बसलेले दिसत आहेत. या पुतळ्याची रचना राजस्थानमध्ये करण्यात आली होती आणि त्याची किंमत USD 75,000 पेक्षा जास्त किंवा सुमारे 60 लाख रुपये आहे.
इंटरनेट सुरक्षा अभियंता गोपी म्हणाले, “अमिताभ बच्चन माझ्यासाठी आणि माझ्या पत्नीसाठी देवापेक्षा कमी नाहीत. मला त्याच्याबद्दल सर्वात जास्त प्रेरणा देणारी गोष्ट म्हणजे त्याचे व्यावसायिक आयुष्य तसेच वैयक्तिक आयुष्य. ते डाउन टू अर्थ व्यक्ती आहे आणि ते त्यांच्या चाहत्यांची खूप काळजी घेत असतात. ते इतर कलांकाराप्रमाणे नाहीत म्हणून मला वाटले की मी त्यांचा पुतळा माझ्या घराबाहेर ठेवावा.”
गोपी सेठच्या म्हणण्यानुसार, अमिताभ बच्चन यांना या पुतळ्याबद्दल माहिती आहे आणि जेव्हा बिग बींना या पुतळ्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी गोपी सेठ यांना सांगितले की ते या सन्मानास पात्र नाहीत. सेठ म्हणाले की, 1991 मध्ये न्यू जर्सी येथे एका नवरात्रीच्या उत्सवात तो पहिल्यांदा त्यांच्या देवाला (बिग बींना) भेटला होता. तेव्हापासून तो त्यांचा मोठा चाहता आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा – ब्रॅंडेड कपडे, आयफॉन, आयपॅड आणि 24 तास व्हिडिओ कॉल, सुकेश चंद्रशेखरचा जेलमध्येही असा होता थाट
भारताच्या विजयाचा अनन्या आणि आयुष्यमानने अशाप्रकारे घेतला आनंद, मजेशीर व्हिडिओ व्हायरल
लहान मुलाला सोडून काम केल्यामुळे ट्रोल झाली भारती सिंग, नेटकऱ्यांना दिले सडेतोड उत्तर