बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) काही दिवसांपूर्वी एका मासिकासाठी फोटोशूट केले होते. रणवीरचे हे न्यूड फोटोशूट लोकांना अजिबात आवडले नाही, त्यामुळे त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला. मुंबई पोलिसांनी 30 ऑगस्ट रोजी रणवीर सिंगला जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते, मात्र रणवीर सिंग आज सकाळी 7.30 वाजता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्याचे जबाब नोंदवले. सुमारे 2 तास रणवीर सिंगचे जबाब नोंदवण्यात आले.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंग स्वत:ला निर्दोष सांगत होता. रणवीर म्हणाला की, मला कल्पना नव्हती की अशा फोटोशूटमुळे त्याच्यासाठी त्रास होईल. कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्याचा हेतू नव्हता. फोटोशूट प्रकरणी रणवीरला पोलिसांनी दोन वेळा बोलावून घेतले, मात्र तो पोहोचला नाही, मात्र आज सकाळी रणवीर त्याच्या कायदेशीर टीमसह चेंबूर पोलीस ठाण्यात पोहोचला आणि दोन तास पोलिसांनी त्याचे जबाब नोंदवले.
यादरम्यान पोलिसांनी रणवीरला अनेक प्रश्न विचारले, उदाहरणार्थ, न्यूड फोटोशूटसाठी कोणत्या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट होते, फोटोशूट केव्हा आणि कुठे केले, तुम्हाला माहिती आहे का की अशा शूटमुळे लोकांच्या भावना दुखावू शकतात. पुढील तपासात सहकार्य करू, असे रणवीर सिंग आणि त्याच्या टीमने पोलिसांना सांगितले.
रणवीर सिंगने एका मासिकासाठी हे फोटोशूट केले होते. या फोटोशूटबाबत नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेक लोक रणवीरच्या बाजूने होते, तर अनेकांनी त्याच्या फोटोशूटवर आक्षेप घेतला होता. रणवीरच्या या फोटोशूटबाबत संपूर्ण बॉलिवूड त्याच्या पाठीशी उभे होते. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी तिच्या फोटोंचे कौतुक केले.
हेही वाचा – भारताच्या विजयानंतर संतोष जुवेकरचा राडा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
राष्ट्रीय क्रीडा दिन | ‘या’ खेळाडूंच्या बायोपिकने प्रेक्षकांना लावले होते वेड
बिग बॉसमधून बाहेर पडताच बला’त्कार आणि जिवे मारण्याची धमकी, ‘या’ दिग्गज अभिनेत्रीने केला मोठा खुलासा