Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

क्या बात है! ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ दाखवणारी आगळी वेगळी मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आजकाल वेगवेगळ्या विषयाच्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. हलकेफुलके विषय हे नेहमीच प्रेक्षकांना भावतात. शिक्षणासाठीची जिद्द, आणि स्वप्नांची ओढ असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर येत्या 12 सप्टेंबर, 2022पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेची विशेष बाब म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरली ही अशी पहिलीच मालिका आहे, ज्या मालिकेचं चित्रीकरण कोकणात सुरू आहे.

कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात चित्रीत होणारी ही नवी मालिका पाहणं प्रेक्षकांनाही विशेष भावेल. कोकणातली नयनरम्य दृश्य, हिरवीगार वनराई, निळाशार समुद्र अशा स्वर्गसुखाच्या सान्निध्यात ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे, याहून दुसरं नेत्रसुख काय असू शकतं. या मालिकेचं चित्रीकरण कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड या गावात सुरू आहे.

‘शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास, बयोच्या प्रयत्नांना शिक्षणाची आस’ असं ब्रीदवाक्य असलेल्या या मालिकेत निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी ही छोटी बयो तिच्या डॉक्टर होण्याच्या मोठ्या स्वप्नाला कसा आकार देणार, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल.

या मालिकेत छोट्या बयोची भूमिका बालकलाकार रुची नेरुरकर हि साकारणार आहे. मूळची कोकणातली असलेल्या रुचीचं मालिकाविश्वातलं हे पदार्पण आहे, तर विक्रम गायकवाड, वीणा जामकर, नम्रता पावस्कर, शरद सावंत हे कलाकारही या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री वीणा जामकर पहिल्यांदाच मालिका विश्वात पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तिच्या अभिनयाची जादू छोट्या पडद्यावर पाहणं विशेष ठरेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

मालिकेतले काही निवडक कलाकारही कोकणातले असल्याने कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात चित्रीकरण करण्याची मज्जा काही औरच आहे. अशा या कोकणपुत्रांचा अभिनय छोट्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल यात शंकाच नाही. ‘इवल्या डोळ्यांना मोठ्या स्वप्नांची ओढ, बयोच्या ध्यासाला पुस्तकाची ओढ’ असं म्हणत पुस्तकात सतत डोकं घालून असणार्‍या बयोचा डॉक्टर होण्याचा प्रवास कसा पूर्ण होईल हे पाहणं रंजक ठरेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
अमिताभ यांना प्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अलींनी दिवसा दाखवलेल्या चांदण्या, एका बुक्कीत…
‘लायगर’ने उठवला विजयचा बाजार! आगामी सिनेमा सुरू होण्यापूर्वीच पडला बंद; स्वखर्चातून करणार नुकसानभरपाई
अर्शदीपच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आयुषमान खुराना; म्हणाला,’देवासाठीतरी…’

हे देखील वाचा