कलाकार नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील गोष्टींबद्दल खुलासे करत असतात. मात्र, यातील काही खुलासे हे पायाखालची जमीन सरकवतात. असाच एक खुलासा ‘बिग बॉस 3‘ या शोमध्ये झळकलेला प्रसिद्ध डिझायनर रोहित वर्मा याने केला होता. त्याने या शोदरम्यान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की, त्याचे अनेक कलाकारांसोबत नाते राहिले आहे. आता त्याने त्याच्या आयुष्याशी निगडीत एक खुलासा केला आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
एका मुलाखतीदरम्यान रोहित वर्मा (Rohit Verma) याने सांगितले की, जेव्हा तो 8 वर्षांचा होता, तेव्हा त्याचे काका त्याच्यावर लैंगिक अत्या’चार करत होते. रोहितने हेही सांगितले की, तो पैशांसाठी कशाप्रकारे वेश्याव्यवसायही करत असे.
सख्ख्या चुलत्याने बालपणी केले लैंगिक अत्या’चार
आरजे सिद्धार्थ कनन याला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान रोहित म्हणाला की, “मी खूप चांगल्या कुटुंबातील आहे. मात्र, माझ्या घरचे खूपच रुढीवादी विचारांचे आहेत. अशा कुटुंबात जन्मूनही मी जन्म घेतल्यानंतर माझे बालपण खूप वाईट होते. माझ्या सख्ख्या चुलत्याने माझ्यावर लैंगिक अत्या’चार केले होते. त्यावेळी मी फक्त 8 वर्षांचा होता. ते मला साडी नेसवायचे. माझ्या पूर्ण शरीरावर गरम वॅक्स लावायचा आणि अनेक भयानक आपत्तीजनक कृत्य करायचे. हे सर्व 3-4 वर्षे चालू राहिले. मी भीतीपोटी कधीच घरच्यांना हे सांगू शकलो नाही.”
View this post on Instagram
वेश्याव्यवसायाचेही केले काम
याव्यतिरिक्त रोहितने मुंबईत त्याच्या सुरुवातीच्या दिवसांची गोष्टही सांगितले. रोहितने सांगितले की, त्याला पैशांची गरज होती, तेव्हा तो ताज हॉटेलसमोर मुलींचे कपडे घालून फिरायचा आणि लोक त्याला घेऊन गेले. त्यातून जे पैसे मिळायचे, त्यातून त्याने डिझायनिंगचे सामान विकत घेतले होते. रोहित म्हणतो की, “मात्र, त्याचा मला खेद नाही. कारण ते मला करायचे होते, कुणीही मला बळजबरी केली नाही.”
अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिलाय रोहित
रोहितने यादरम्यान अनेक खुलासे केले. तो म्हणाला की, तो एका अभिनेत्याला डेट करत होता. ते दोघे लिव्ह इनमध्ये राहायचे. मात्र, त्याला जेव्हा जास्त काम मिळू लागले, तेव्हा त्याचा व्यवहार बदलला.
प्रसिद्ध डिझायनर आहे रोहित
रोहितबद्दल बोलायचं झालं, तर तो इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. मुंबईत त्याचा स्वत:चा स्टुडिओ आहे. रोहितने अनेक सिनेमांमध्ये सेलिब्रिटी, फॅशन शो आणि लाँचसाठी कॉस्च्युम डिझाइन केले आहेत. रोहितला सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या ‘बिग बॉस 3’ (Bigg Boss 3) शोमधून प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये त्याने LGBTQ समुदायाचे प्रतिनिधित्व केले होते
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
क्या बात है! ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ दाखवणारी आगळी वेगळी मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
अमिताभ यांना प्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अलींनी दिवसा दाखवलेल्या चांदण्या, एका बुक्कीत…
‘लायगर’ने उठवला विजयचा बाजार! आगामी सिनेमा सुरू होण्यापूर्वीच पडला बंद; स्वखर्चातून करणार नुकसानभरपाई