रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली. प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आला असला, तरी विरोध मोडून काढत हा चित्रपट बऱ्यापैकी कमाई करत आहे. 410 कोटी रुपयांच्या बजेटचा हा चित्रपट बॉलिवूडमध्ये बनलेला आतापर्यंतचा सर्वात महागडा बजेट चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या कलेक्शनचे आकडे पाहता अयान मुखर्जीच्या 10 वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळत आहे, असे म्हणता येईल.
अयान मुखर्जीच्या साय-फाय चित्रपटाने पहिल्या दिवशी 36 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशीही चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. दुस-या दिवशी या चित्रपटाने देशभरात जवळपास 41.50 कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसांत या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये एकूण 77 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी ब्रह्मास्त्रसाठी सकारात्मक संकेत आहे.
जगभरात 8,913 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’च्या ग्रॉस वर्ल्ड वाइड कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 75 कोटी आणि दुसऱ्या दिवशीचे 85 कोटी असे मिळून चित्रपटाने आतापर्यंत 160 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी ब्रह्मास्त्रने जगभरातील बॉक्स ऑफिसवर तब्बल 75 कोटींची कमाई केली.
आलिया आणि रणबीरचा चित्रपट रिलीज झाल्यापासून दोघेही आपल्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना तो पाहण्याची विनंती करत आहेत. त्याचबरोबर आलिया भट्ट गरोदरपणातही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडत नाहीये. ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर कपूरशिवाय आलिया भट्ट, नागार्जुन, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात शाहरुख खानचीही छोटी भूमिका आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अदाची मनमोहक अदा! नेटकरी फिदा
‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचे अनेकांनी केले कौतुक, पण विवेक अग्निहोत्री यांच्या ‘त्या’ प्रतिक्रियेने वेधले लक्ष
दहा वर्षांची मेहनत फळाला आली! ‘ब्रह्मास्त्र’च्या स्पेशल स्क्रीनिंगला धाय मोकलून रडले अयान मुखर्जी