Friday, March 14, 2025
Home टेलिव्हिजन पैशाच्या कमतरतेमुळे उर्फी जावेदने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, वाचा तिची संघर्षमय कहाणी

पैशाच्या कमतरतेमुळे उर्फी जावेदने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, वाचा तिची संघर्षमय कहाणी

उर्फी जावेद हे नाव कदाचितच कोणाला माहित नसेल कारण तिने तिच्या अतरंगी ड्रेसिंग सेन्सने भल्या भल्या व्यक्तींना विचार करण्यास भाग पाडले आहे. आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने बिंधास्त स्टाइलने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तिला तिच्या ड्रेसमुळे ट्रोलही केले जाते आणि काहीजन तिच्या कपड्यांची प्रशंसाही करतात. मात्र, आज आपण उर्फीच्या कपड्याबद्दल नाही तर तिच्या जीवनातल्या खडतर प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.

उर्फी जावेद(Urfi Javed) तिच्या स्टाइलमुळे तर नेहमीच चर्चेत असते मात्र, बिग बॉस ओटीटीमध्ये आल्यामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी लाभली होती आणि तिने आपल्या अतरंगी आउटफीटने आणखीनच यशाचे शिखर गाठले आहे. एकीकडे तिला ट्रोल केले जाते, तर दुसरीकडे तिला चाहत्यांचे प्रेमही मिळते. ती कोणत्याही कार्यक्रमात गेली की, चाहत्यांची गर्दी जमा होते. उर्फीचे हेच स्वप्न होते की, ती चाहत्यांची फेवरेट बनावी आणि तिला बघण्यासाठी गर्दी जमावी. पण तिला हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी खूपच कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. ती शोएब इंडस्ट्रीमध्ये 8 वर्षापासून सक्रिय होती मात्र, काम मिळने फारच अवघड होते. तिला कोणी ओळखतही नव्हते.

उर्फीच्या आयुष्यात एक वेळ अशीही आली होती की, ती पूर्णपणे हारली होती आणि एवढेच काय तर तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ती खूपच आत्मविश्वासू मुलगी आहे. आणि तिला लहानपणापासूनच प्रसिद्ध होण्याची इच्छा होती. काहीतरी मोठे करायचे आहे पण कसे हे माहीत नव्हते. या अभिनेत्रीचे कुटुंब खूपच जुन्या विचाराचे होते. त्यामुळे उर्फीने आपले घरही सोडले होते, आणि ती कॉलसेंटरमध्ये काम करु लागली होती तेव्हा तिला जॉब इंटरव्यूवसाठी फोन आला आणि ती मुंबईमध्ये आली.

मुंबईमध्ये आल्यावर मैत्रिणीच्या घरी राहिली होती. तिने एक महिना राहून बघण्याचा निर्णय केला कारण कॉलसेंटरमध्ये काम करुन काही खास पैसे मिळत नव्हते. तिचे असेच दोन ते तीन महिने गेले. पण तिल एक आशा होती की, तिचे कुटुंब तिला परत स्विकारेल. एकवेळ अशीही आली होती की, उर्फी डिप्रेशनला सामोरे जाउन तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस उर्फीकडे घरी परत जाण्याचेही पैसे नव्हते, ती रस्त्यावर आली होती. तिच्या डोक्यामध्ये एकच विचार होता की, हे नाही तर काहीच नाही. घरी परत जाण्याचाही पर्याय नव्हता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
अवॉर्ड फंक्शनमध्ये रणवीरसिंगचा जलवा! अल्लू अर्जुन, यशसोबत घातला धुमाकूळ
तब्बल चार वेळा लग्न करून ‘ही’ अभिनेत्री आलेली चर्चेत, सध्या पाकिस्तानमध्ये ‘असे’ काढते आयुष
बापरे! नेहा कक्करने स्पर्धकाला पाहून जज करण्यास दिला नकार, कारण ऐकून बसेल धक्का

हे देखील वाचा