राकेश बापट हा लोकप्रिय अभिनेता जेवढा चित्रपट दुनियेत गाजला आहे, तेवढाच तो टेलिव्हिजन दुनियेतही गाजलेला आहे. तो अभिनय क्षेत्रावर खूप दिवसांपासून राज्य करत आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून अमाप प्रसिद्धी मिळवली आहे. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. त्याने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत एक कविता कॅप्शनमध्ये लिहिली आहे, त्यामुळे राकेश बापट खूपच चर्चेत आला आहे. चला तर जाणून घेऊया पुर्ण माहिती.
राकेश बापट(Raqesh Bapat) हा हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील खूपच लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने चित्रपटाशिवाय टीव्ही कार्यक्रमामध्येही काम केले आहे. त्याने हिंदी सिनेसृष्टीमध्ये ‘तुम बिन’, ‘वृंदावन’ आणि ‘कोई मेरे दिल में हैं’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपला धमाकेदार अभिनय गाजवला आहे. यानंतर त्याने टीव्ही सीरिअलमध्ये एंट्री केली. त्याने ‘सात फेरे’, ‘मर्यादा’, आणि ‘कुबूल हैं’ अशा लोकप्रिय कार्यक्रमामध्ये काम केले होते. यानंतर तो लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस’ ओटीटी आणि ‘बिग बॉस'(Bigg Boss) 15 मध्येही सहभागी झाला होता.
View this post on Instagram
त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तो चांगलाच चर्चेत आला होता. त्याने 2011 मध्ये ‘मर्यादा’ कार्यक्रमातील रिद्धी डोगरा (Ridhi Dogra) सोबत धूमधडाक्यात लग्न केले होते. पण हे लग्न फक्त 8 वर्षच टिकले आणि 2019 मध्ये यांचा घटस्फोट झाला. यानंतर तो ‘बिग बॉस 15’ मध्ये स्पर्धक शमिता शेट्टी (shamita shetty) सोबत रिलेशनशिपमध्ये होता, पण तिच्यासोबतही राकेशचा ब्रेकअप झाले. यामुळे राकेशने आपले दु:ख व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे.
राकेश बापटची भावूक पोस्ट शेअर
राकेश बापटने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावूक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एका नावमध्ये ऊभा असून फोटोमध्ये बघताना दिसत आहे. या फोटोला शेअर करत असताना कॅप्शनमध्ये एक भावूक कविताही लिहिली आहे. या कविताने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे आणि त्याच्या या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “न चादर बङी कीजिये, न ख्वाहिशे दफन कीजिये, चार दिन की जिन्दगी हैं, बस चैन से बसर कीजिये…न परेशान किसीको कीजिये, न हैरान किसी को कीजिये, कोई लाख गलत बोले, बस मुस्कुराकर छोङ दीजिये…न रुठा किसी से कीजिये, झूठा वादा किसी से कीजिये, कुछ फुरसत के पल निकालिये, कभी खुदसेभी मिला कीजिये.”
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
राकेश बापटने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोवर चाहते कमेंटचा पाऊस पाडत आहेत त्यापैकी एका युजरने लिहिले आहे की, कडक, ब्युटीफुल, मजेदार ओळी म्हणत चांगलीच प्रशंसा केली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा
अंजली अरोरानंतर आणखी एका भोजपुरी अभिनेत्रीचा एमएमएस व्हिडिओ लीक? चाहते आणि ट्रोलर्समध्ये रंगला वादजॉनी डेप आणि अँबर हर्ड प्रकरणावर येणार चित्रपट ‘या’ दिवशी पोहायला मिळणार मोफत प्रिमियर
नोरा, जॅकलीनचं नव्हे, ‘ही’ मराठमोळी अभिनेत्रीही फसली सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात, दिली इतक्या कोटींची गिफ्ट