Wednesday, October 15, 2025
Home टेलिव्हिजन ‘कौन बनेगा करोडपती’ व्हायरल प्रोमो, कोल्हापूरच्या गृहीणीने मिळवला पहिली करोडपती होण्याचा मान

‘कौन बनेगा करोडपती’ व्हायरल प्रोमो, कोल्हापूरच्या गृहीणीने मिळवला पहिली करोडपती होण्याचा मान

सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या अमिताभ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे.  कार्यक्रमात विविध क्षेत्रातील अनेक स्पर्धक त्यांचे नशीब आजमावण्यासाठी येत असतात. मात्र आत्तापर्यंत 14 व्या पर्वाला एकही करोड रुपये जिंकेल असा स्पर्धक मिळाला नव्हता. मात्र आता ही प्रतिक्षा संपली असून ‘कौन बनेगा करोडपती 14’ कार्यक्रमाला पहिला करोडपती स्पर्धर मिळाला आहे. कोल्हापूरमधील एका गृहीणीने हा मान मिळवला आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की अमिताभ बच्चन यांच्या क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती 14’ला पहिला करोडपती मिळाला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरची राहणारी 45 वर्षीय कविता चावला या शोची पहिली करोडपती स्पर्धक म्हणून समोर आली आहे. सोनी टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शोचा प्रोमो शेअर करून हा खुलासा झाला आहे. चॅनलने शेअर केलेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये कविता चावलाने आपण कोणापेक्षा कमी नसल्याचे सिद्ध केले आहे. स्पर्धक आणि प्रेक्षकांचा आनंद प्रोमोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

रिलीज झालेल्या नवीन प्रोमोमध्ये, अमिताभ बच्चन यांनी कविताने एक कोटी जिंकल्याची घोषणा केली आहे. अमिताभ यांनी घोषणा करताच कविता आनंदाने उडी मारते. त्याच्यासोबत सेटवर उपस्थित असलेले प्रेक्षकही खुश झाले आणि उभे राहून टाळ्या वाजवू लागले. त्याचवेळी अमिताभ बच्चनही कविताला उभे करून त्यांचे मनोबल वाढवतात. व्हिडिओच्या पुढे असलेल्या क्लिपमध्ये अमिताभ कविताला 7.5 कोटी रुपयांचा प्रश्न विचारताना दिसत आहेत, क्लिपमध्ये कविता अमिताभच्या प्रश्नांचा विचार करताना दिसत आहे. मात्र, शोमधील क्लिपमध्ये अमिताभ यांनी त्यांना कोणता प्रश्न विचारला हे सांगण्यात आलेले नाही.

प्रोमो शेअर करताना चॅनलने  ‘गृहिणी कविता चावलाने KBC सीझन 14 मध्ये 1 कोटी जिंकून एक नवा इतिहास रचला आहे.” असा कॅप्शन दिला आहे. प्रोमो रिलीज झाल्यानंतर शोचे चाहते खूप खुश आहेत. शोच्या प्रोमो पोस्टवर यूजर्स कविताचे अभिनंदन करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा – अमिताभ बच्चन यांचा जुहूमधील ‘त्या’ बंगल्याविषयी मोठा खुलासा, एकाच क्लिकवर घ्या जाणून
चालू कारमध्ये सपना चौधरीने केला असा डान्स की; समोरच्या ट्रकमधील महिलांनीही धरला ठेका, व्हिडिओ तुफान व्हायरल
‘डान्स आणि एक्शन सीन करु नकोस…’ ऋतिक रोशनला डॉक्टरांनी दिला सल्ला, अभिनेत्याचे उत्तर ऐकून कराल कौतुक

हे देखील वाचा