बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एक कलाकार होणे खूप अवघड असत. एक कलाकार म्हणून त्यांना प्रत्येक गोष्ट खूप बारकाईने करावी लागते. त्यांच्या चाहत्यांमुळे त्यांना घराच्या बाहेर जाणे देखील कठीण होऊन जाते. त्यासाठी त्यांना बॉडीगार्डची आवश्यकता भासते. या साठीच सेलिब्रिटी आपल्यासाठी एका सुरक्षा रक्षकाची सोय करतात.
हे कलाकार त्यांच्या इतर गोष्टीसोबतच त्यांच्या सुरक्षिततेसाठी खूप खर्च करताना दिसतात. हॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, जे आपल्या सुरक्षिततेसाठी ते खूपच जास्त खर्च करत असतात. चला तर बघुयात सुरक्षिततेसाठी अमाप रुपये खर्च करणाऱ्या हॉलिवूड कलाकारांबद्दल…
जेनिफर एनिस्टन
अमेरिकन सिटकॉम फ्रेंडची अभिनेत्री आणि हॉलिवूड मधील फेमस स्टार जेनिफर एनिस्टन ही जगभरात प्रसिद्ध आहे. जेव्हा केव्हा जेनिफर घराबाहेर पडते, तेव्हा तिचे फॅन्स तिच्या भोवती घोळका घालतात. तिला त्या गर्दीतून बाहेर पडणे खूप अवघड होऊन जाते. त्यामुळे ती कुठेही जाताना तिच्या सुरक्षा रक्षकासोबत जात असते. इन्वेस्टिगेटिंग डॉट कॉम रिपोर्टनुसार, एनिस्टन आपल्या सुरक्षेसाठी वर्षभरात 2,40, 000 डॉलर म्हणजेच जवळपास 1,74,45,420 एवढा खर्च करते.
मेगन मार्कल
ससेक्समधील डचेस मेगन मार्कल आणि प्रिन्स हेन्री हे लाईमलाईट मध्ये असतात. या दिवसात हेन्री आणि मेगन हे ओपरा विन्फ्रे यांच्यासोबत झालेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. ते त्यांच्या सुरक्षेसाठी एका वर्षात 20 मिलियन डॉलर म्हणजेच 1,45,37,85,000 एवढा खर्च करतात.
कायली जेनर
कर्दाशियां जेनर कुटुंबातील सर्वात लहान आणि सर्वात यशस्वी सदस्य कायली जेनर ही आज जगभरात प्रसिद्ध आहे. सर्वात कमी वयात मोठा व्यवसाय सांभाळणारी कायली आपल्या सुरक्षेसाठी वर्षभरात 4.8 मिलियन म्हणजेच 34,89,08,400 एवढा खर्च करते.
रिहाना
रिहाना ही अमेरिकन म्युझिक इंडस्ट्रीमधील एक मोठे नाव आहे. ती कुठेही जाईल तिला तिचे सुरक्षारक्षक सोबत घेऊनच जावे लागते.
ती वर्षभरात तिचा सुरक्षेसाठी 5,00, 000 डॉलर्स म्हणजे जवळपास 36,34,00,625 एवढा खर्च करते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बड्डे गर्ल आलियाने ९ वर्षांच्या करियरमध्ये कमावलीय तब्बल ‘एवढ्या’ कोटींची प्रॉपर्टी