आतापर्यंत कदाचित तुम्ही फक्त मुले किंवा पुरुष यांनाच महिलांना त्यांच्या शारीरिक व्यंगावरून खिल्ली उडवताना पाहिले असेल. मात्र, विचार करा जर स्त्रिया आणि मुली हे काम करू लागल्या तर? बॉडी शेमिंग, महिलांचा लठ्ठपणा आणि त्यावरील लोकांचा दृष्टिकोन यावर ‘डबल एक्सएल‘ या नावाचा एक चित्रपट येतोय. ज्याचा टिझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. टिझरमध्ये चित्रपटाच्या संकल्पनेची झलक दिसत आहे आणि ती खूपच मजेदार आहे.
टिजरमध्ये हुमा कुरेशी (Huma Qureshi) आणि साेनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) एका बाकावर बसल्या आहेत. हुमा सोनाक्षीला सांगते की, “जग भलीमोठी कुर्ती घातल्यानंतर त्यामधील चरबीदेखील पाहतात आणि हे पोट कितीही आत टाकलं, तरी जीन्स नेहमी मांडीवरच अडकते.” हुमाच्या बोलण्यावर सोनाक्षी हसते. मग सोनाक्षी म्हणते की, “मुलांची मागणी आणखी विचित्र आहे. त्यांना ब्रा मोठी आणि सडपातळ कंबर हवी असते.” सोनाक्षीचे म्हणणे ऐकून हुमा माेठ- मोठ्याने हसते. सोनाक्षी सिन्हा मुलांसाठी म्हणते, “तुम्हाला एखादी छोटी-मोठी गोष्ट मागितली तर कुठे जाणार तुम्ही?”
या दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार चित्रपट
‘डबल एक्सएल’ चित्रपटासाठी साेनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीने बरेच वजन वाढवले आहे, जेणेकरून ते त्यांच्या भूमिकेत परफेक्ट दिसायला हवेत. चित्रपटात अभिनेता जहीर इकबाल देखील दिसणार आहे. एका मुलाखतीत जहीर इकबालने सांगितले की, “हुमा आणि साेनाक्षीने चित्रपटासाठी जवळ- जवळ 15 ते 20 किलो वजन वाढवले. यासाठी त्यांनी भरपूर खाल्ले आणि आहार वाढवला.”
‘डबल एक्सएल’ हा चित्रपट सतराम रमानी यांनी दिग्दर्शन केला आहे. हा चित्रपट 14 ऑक्टाेंबरला रिलीज हाेणार असून त्यादिवशी आयुष्यमान खुराना, रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शाह यांचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट देखील रिलीज हाेणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीनेच लावला शारीरिक अत्या’चाराचा आरोप, फसवणूक अन् ब्लॅकमेल केल्याचाही खुलासा
परिस्थिती काय, बोलतोय काय! राजूंच्या अंत्यसंस्कारात चाहता कॉमेडियनसोबत सेल्फीसाठी उतावळा, व्हिडिओ व्हायरल
राजूंच्या निधनामुळे अमिताभ बच्चनही गेले खचून; म्हणाले, ‘माझा आवाज ऐकून त्याने डोळे उघडलेले, पण…’