'अप्सरा' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असते.
सोनाली तिच्या चाहत्यांसाठी दररोज नवनवीन फोटो शेअर करत असते.
अशात तिने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
या फोटोंमध्ये ती इंडो-वेस्टर्न ड्रेसमध्ये खूपच सोज्वळ दिसत आहे.
ती या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत असून या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.
सोनाली शेवटची 'तमाशा लाईव्ह' या सिनेमात दिसली होती. आता ती 'व्हिक्टोरिया' आणि 'ताराराणी छत्रपती' या आगामी सिनेमात दिसेल.