बुधवारी (दि. 21 सप्टेंबर) कलाविश्वाला मोठा धक्का बसला. तो म्हणजे, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. तसेच, चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण दु:ख व्यक्त केले. त्यांच्यावर गुरुवारी (दि. 22 सप्टेंबर) अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर काही वेळानंतरच महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये राजूंबद्दल आपल्या भावना लिहिल्या. विशेष म्हणजे, राजू जेव्हा रुग्णालयात दाखल होते, तेव्हा अमिताभ यांनी त्यांचा संदेश रेकॉर्ड करून पाठवला होता. तो मेसेज राजूंना दररोज ऐकवला जात होता.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना ‘सहकारी, मित्र आणि एक रचनात्मक कलाकार’ म्हणून संबोधित केले. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमधून राजूंना श्रद्धांजली वाहत त्यांची आठवण काढली. त्यांनी लिहिले की, “आणखी एक सहकारी, मित्र आणि एक रचनात्मक कलाकार आम्हाला सोडून गेला. अचानक आजारपण आले आणि पुन्हा तो वेळेपूर्वीच निघून गेला. आता कुठे त्यांची रचनात्मकता बाहेर येणार होती. त्यांची विनोदबुद्धी आणि जन्मजात हास्यकला सदैव आपल्यासोबत राहील. तो आता स्वर्गातून हसत राहील आणि देवालाही हसवत राहील.”
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये त्या व्हॉईस रेकॉर्डिंगचाही उल्लेख केला, जो त्यांनी कोमात असलेल्या राजूंसाठी रेकॉर्ड करून पाठवला होता. त्यांनी सांगितले की, “राजूंच्या कुटुंबीयांनी त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होण्यासाठी एक संदेश रेकॉर्ड करून पाठवण्याची विनंती केली होती. मी असे केले आणि राजूंनी माझा आवाज ऐकल्यानंतर एकदा आपले डोळेही उघडले होते. मात्र, नंतर पुन्हा त्यांनी डोळे बंद केले होते.”
View this post on Instagram
राजू श्रीवास्तव हे अमिताभ बच्चन यांच्या खूप जवळ होते. ते त्यांचा एक शब्दही टाळत नव्हते. ते अमिताभ यांचा प्रत्येक सल्ला ऐकायचे. राजू आणि अमिताभ यांच्यातील बाँडिंग किती मजबूत होती, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, राजूंनी स्टेजवर त्यांच्या अनेक भूमिका साकारल्या आणि त्यांची मिमिक्री करून लोकांचे मनोरंजन केले होते. राजूंकडे चाहत्यांंनी अमिताभ यांची मिमिक्री करण्याची विनंती केल्यानंतर ते कधीच चाहत्यांना निराश करत नव्हते. राजू आज आपल्यात नसले, तरीही त्यांच्या आठवणी सदैव आपल्यासोबत राहतील, अशा चाहत्यांच्या भावना आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
म्हणून प्रसिद्ध अभिनेत्यावर आली ‘बिग बॉस’मध्ये काम करण्याची वेळ; म्हणाला, ‘इतके सिनेमे देऊनही…’
यामुळे रणबीरने घेतले नाही ‘ब्रम्हास्त्र’साठी मानधन, दिग्दर्शकाने केले मोठा खुलासा
‘बटण लावायला विसरलीस का…’, अभिनेत्री जान्हवी कपूरची विमानतळावर झाली चांगलीच फजिती, व्हिडिओ व्हायरल










