Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

बाबो! मेकअप आर्टिस्टच्या सांगण्यावरून तब्बूने खरेदी केलेली ‘एवढ्या’ हजारांची क्रीम; म्हणाली, ‘आता कधीच…’

बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्री तब्बू हिने तिच्या अभिनयाच्या बळावर सर्वत्र नाव कमावले आहे. ‘चांदनी बार’पासून ते ‘मकबूल’ आणि ‘हैदर’पर्यंत अनेक चित्रपटात तिने काम केले आहे. तिच्या अभिनयाचे केवळ भारतात नाही, तर परदेशात देखील चाहते आहेत. 30 वर्षात तब्बूने इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. 51 वर्षांच्या तब्बूचे साेंदर्य अजूनही कायम आहे. नुकतेच एका मुलाखतीत तब्बूने तिच्या साेंदर्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

‘भूल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa) या चित्रपटामध्ये तब्बू (Tabu) हिने अंजुलिका आणि मंजुलिका या जुळ्या बहिनींची भूमिका साकारली हाेती. चित्रपटात कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) मुख्य भूमिकेत होते. नुकतेच तब्बूला एका मुलाखतीदरम्यान तिच्या साेंदर्याचे रहस्य विचारण्यात आले. त्यावेळी तिने सांगितले की, “विशेष काही नाही. माझी मेकअप आर्टिस्ट बाेलली, ‘मॅम स्किन टवटवीत दिसत आहे. तुम्ही काही घरगूती उपाय करता का?’ तर मी तिला सांगते की, मी कधी आयुर्वेदिक उपाय करते किंवा काॅफी लावते. त्यावर ती बाेलली, ‘तुम्ही असं करायला नकाे. तुम्ही हे क्रीम लावायला हवं.'” पुढे तब्बू म्हणाली, “त्यानंतर तिने काेणतं तरी 50 हजार रुपयांचं क्रीम सुचवलं. एकदा विकत घेतलं. यापुढे घेणार नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Tabu (@tabutiful)

तब्बूला विचारण्यात आले की, तिच्या आनंदाचे आणि तजेलदार त्वचेचे रहस्य काय आहे? यावर तब्बूने सांगितले की, “मी चेहऱ्यासाठी काही खास करत नाही, पण मला माहीत आहे की, मी चांगली कशाप्रकारे दिसू शकते. मी जाणूनबुजून त्या गाेष्टींच्या वाट्याला जात नाही. काेणी अभिनेत्री नसूनही चांगलं दिसू इच्छिते, मी देखील हाच प्रयत्न करते.”

तब्बूने ‘दृष्यम’, ‘दे दे प्यार दे’, ‘हवा’, ‘गोलमाल अगेन’, ‘भूल भुलैय्या 2’, ‘हम साथ साथ हैं’, ‘हैदर’, ‘जवानी जानेमन’, ‘जय हो’, ‘हेरा फेरी’, ‘विजयपथ’, ‘फितूर’, ‘मिसिंग’, ‘हकीकत’, ‘जित’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा शूटिंग करतानाच ‘ही’ बोल्ड अभिनेत्री झालेली बेशुद्ध; इलेक्ट्रिक शॉक देऊन वाचवला होता तिचा जीव
शाहरुख अन् ‘थालापती’ने ऍटलीचा वाढदिवस बनवला खास; दिग्दर्शक म्हणाला, ‘माझे आधारस्तंभ…’
हिजाब वादादरम्यान मंदाना करीमीच्या पोस्टने वेधले लक्ष, प्रदर्शन करणाऱ्या महिलांचा व्हिडिओ केला शेअर

हे देखील वाचा