Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

आमिरसारखी बॉडी करायला गेला मग 10 दिवस दवाखान्यात भरती झाला ‘हा’ अभिनेता

बॉलिवूडमध्ये हल्ली मोठंमोठे कलाकार चित्रपटासाठी आपली बॉडी बनवताना दिसतात. त्याचबरोबर इन्टाग्रामवर आपली बॉडी फ्लॉट करतानाही दिसतात. बॉलिवूड सेलिब्रेटींची बॉडी पाहून त्यांच्या चाहत्यांनाही तशी बॉडी बनवायची इच्छा होते. फक्त चाहतेच नाही तर आपल्या आवडत्या हिरोची बॉडी पाहून नवोदित हिरोही तशीच बॉडी करण्याचा प्रयत्न करतात.

असाच एक अभिनेता आहे ज्यानंही अशीच बॉडी बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला चक्क 10 दिवस हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले. हा अभिनेता म्हणजे फवाद खान(Fawad Khan). त्याच्या एका चित्रपटासाठी त्याला आमिर खान(Aamir Khan) यांच्यासारखी बॉडी बनवायची होती तसा त्यानं प्रयत्न केलाही परंतु त्याचा विपरित परिणाम झाला आणि त्याच्या शरीरात विविध बदल होत गेले.

त्याच्या किडनीवरही परिणाम झाला आणि तो इतका झाला की त्याला त्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले. फवाद खानने एका मुलाखतीत सांगितले की त्याला क्रिश्चियन बेल आणि आमिर खान याच्यासारखी बॉडी बनवायची होती परंतु असे करणे त्याला महागात पडले. तेव्हा यानंतर आपण परत असं कधीच करणार नाही असं निश्चयही फवादने केला. सेलिब्रेटी ज्या प्रकारे चित्रपटासाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करतात त्याप्रमाणे फवाद खानलाही करायचं होतं.

मुलाखतीदरम्यान फवाद खानने असेही सांगितले की, असे केल्यामुळे मला 10 दिवस हॉस्पिटलमध्ये एडमिट व्हावं लागलं. त्याचबरोबर आपल्या या चुकीमुळे शरीराचेही हाल झाले आपण असं करायला नको होते. आपण दुसऱ्याचं कॉपी करू शकतं नाही मग ते काहीही असो, अशी कबूलाही त्यानं दिली. फवाद खान आगामी चित्रपट ‘द लीजेंड ऑफ मौला जट’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बाबो! मेकअप आर्टिस्टच्या सांगण्यावरून तब्बूने खरेदी केलेली ‘एवढ्या’ हजारांची क्रीम; म्हणाली, ‘आता कधीच…’

जेव्हा शूटिंग करतानाच ‘ही’ बोल्ड अभिनेत्री झालेली बेशुद्ध; इलेक्ट्रिक शॉक देऊन वाचवला होता तिचा जीव
शाहरुख अन् ‘थालापती’ने ऍटलीचा वाढदिवस बनवला खास; दिग्दर्शक म्हणाला, ‘माझे आधारस्तंभ…’

हे देखील वाचा