साऊथ इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. दोन प्रसिद्ध मल्याळी अभिनेत्रींनी सोशल मीडियाद्वारे खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले की, केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात एका मॉलमध्ये सिनेमाचे प्रमोशनदरम्यान त्यांचा लैंगिक छळ झाला होता. लोकांच्या ‘लैंगिक निराशा’बद्दल राग आणि चिंता व्यक्त करत तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मंगळवारी (दि. 27 सप्टेंबर) रात्री मॉलमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान आणखी एका अभिनेत्रीला असाच अनुभव आला होता.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहण्यात आला आणि स्थानिक टीव्ही चॅनेलनी त्याचे प्रसारण केले. अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “कोझिकोड एक अशी जागा आहे, ज्यावर माझे प्रेम आहे. मात्र, आज रात्रीच्या कार्यक्रमानंतर परतताना गर्दीतील एका व्यक्तीने मला पकडले. मला हे सांगायला अजिबात आवडत नाही की, आजूबाजूचे लोक इतके निराश आहेत का?”
अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “आम्ही सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी जात असतो. मात्र, मला असा वाईट अनुभव दुसरीकडे कुठेच आला नव्हता. माझ्या सहकारीचाही असाच अनुभव आहे.” जमावाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या इतर अभिनेत्रीनेही तिच्या इंस्टाग्रामद्वारे तिचे वाईट अनुभव शेअर केले. तिने सांगितले की, “मॉलमध्ये गर्दी होती आणि सुरक्षा रक्षक गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करत होते.”
हेही वाचा- रणबीर कपूरच्या पहिल्या कमाईची कहाणी, जेव्हा नीतू कपूरच्या हाती दिला होता 250 रुपयांचा चेक
आरोपींनी शिक्षा देण्याची मागणी
अभिनेत्रीने पुढे म्हटले की, एका व्यक्तीने तिच्या महिला सहकलाकारासोबत वाईट कृत्य केले. मात्र, ती प्रतिक्रिया देऊ शकली नाही. ती म्हणाली, “नंतर मलाही अशाच प्रकारच्या अनुभवाचा सामना करावा लागला. मात्र, मी याचे उत्तर दिले. माझी अशी इच्छा आहे की, कुणालाही आपल्या आयुष्यात अशा अनुभवांचा सामना करावा लागला नाही पाहिजे.” तिने असेही म्हटले की, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे.
पोलिसांनी सुरू केला प्रकरणाचा तपास
पोलिसांनी याप्रकरणी म्हटले की, त्यांनी या प्रकरणाचा तसाप सुरू केला आहे. तसेच, आरोपींची ओळख करण्याचा आणि त्यांचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका महिन्यापूर्वी याच मॉलमध्ये आयोजित एक प्रमोशन कार्यक्रम वेळेच्या आधीच संपवावा लागला होता. कारण, आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी जमा झालेले चाहत्यांची गर्दी नियंत्रणाबाहेर जात होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, 19 वर्षीय मुलाचे निधन
टेलिव्हिजनवरील ‘या’ सोज्वळ अभिनेत्रींनी घातला ‘बिग बॉस’मध्ये धुमाकूळ, बिकिनी लूकने केले चाहत्यांना घायाळ