Friday, January 3, 2025
Home भोजपूरी शिल्पी राजच्या ‘बेचब बीडी पान’ गाण्यानं युट्यूबरवर घातलाय राडा; पाहा व्हिडिओ

शिल्पी राजच्या ‘बेचब बीडी पान’ गाण्यानं युट्यूबरवर घातलाय राडा; पाहा व्हिडिओ

लोकप्रिय भोजपुरी गायिका शिल्पी राज (Shilpi Raj) तिच्या दमदार आवाजाने प्रेक्षकांवर नेहमीच भुरळ घालत असते. शिल्पी राजचे प्रत्येक गाणे प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या तिचे आणखी एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे, ज्यामध्ये तिच्या आवाजाची जादू पाहायला मिळत आहे. शिल्पी राजचे ‘बेचब बिडी पान’ हे भोजपुरी लोकगीत रिलीज झाले आहे. हे गाणे लोकप्रिय चॅनल वर्ल्डवाईड भोजपुरी वरून रिलीज करण्यात आले आहे, जे लोकांना खूप आवडले आहे. गाण्यावर चाहते भरभरुन प्रेमाच वर्षाव करत आहेत.

सबा तिच्या लूकने भोजपुरी प्रेक्षकांना करत आहे घायाळ 
गायिका शिल्पी राज(Shilpi Raj) हिचे भोजपुरी लोकगीत ‘बेचब बिडी पान'(Bechab Bidi Paan) चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. यात शिल्पी राजसोबत अभिनेत्री सबा खान(Saba Khan) देखील आहे. यात भोजपुरी अभिनेत्री ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. सबाने साडी नेसली असली, तरी तिची स्टाईल भोजपुरी प्रेक्षकांना घायाळ करायला पुरेशी आहे. गाण्यात साबा अतिशय गोंडस पद्धतीने, तिच्या ऑनस्क्रीन पतीला पान बिडीचे दुकान उघडण्यास सांगत आहे, जणेकरून त्याची कमाई दुप्पट होईल. दोघांमधला हा मजेशीर संवाद गाण्यात अतिशय उत्तमरित्या मांडण्यात आला आहे.

वर्ल्डवाइड रेकॉर्ड्सनुसार, भोजपुरी प्रस्तुत ‘बेचब बिडी पान’ची गायिका शिल्पी राज आहे. याचे गीत विजय चौहान यांनी लिहिले असून संगीत आर्या शर्मा यांनी दिले आहे. या गाण्याची निर्मिती रत्नाकर कुमार यांनी केली आहे, तर दिग्दर्शन गोल्डी जैस्वाल यांनी केले असुन, नृत्यदिग्दर्शन बॉबी जॅक्सनने केले आहे. या गाण्याला काही वेळातच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबरच गाण्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव हाेत आहे.

याआधी शिल्पी राजचे ‘बंधू तीन दिन 2.0’ हे गाणेही खेसारी लाल यादवसोबत रिलीज झाले होते, या गाण्यालाही चांगलीच पसंती मिळाली हाेती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
बॉलिवूडने असं काय केलं, ज्यामुळे दिग्गज अभिनेत्री आशा पारेख यांना आली चीड? म्हणाल्या…
बाॅलिवूडमधील ‘हे’ कलाकार का वापरत नाहीत साेशल मीडिया? ‘नवाब’ सैफने दिले धक्कादायक कारण

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा