Saturday, August 9, 2025
Home बॉलीवूड ‘माझी भूमिका तू साकारणार म्हणजे…’; सुष्मिता सेनच्या भूमिकेबद्दल गौरी सावंतने केली पोस्ट शेअर

‘माझी भूमिका तू साकारणार म्हणजे…’; सुष्मिता सेनच्या भूमिकेबद्दल गौरी सावंतने केली पोस्ट शेअर

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन(Sushmita Sen)हिने काही दिवसांपूर्वी तिच्या ताली या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते. रवी जाधव दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित या बायोपिकमध्ये सुष्मिता सेनचा फर्स्ट लूकपाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले होते. या चित्रपटात सुष्मिता ट्रान्सजेंडर गौरी सावंत (Gauri Sawant) यांची भूमिका साकारणार आहे. नुकतीच गौरी सावंत यांनी सुष्मितासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

गौरी सावंतनी शेअर केली पोस्ट
गौरी सावंत यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केली आहे. गौरी यांनी सुष्मितासोबत एक फोटो शेअर करत म्हटलं आहे की, ‘आम्ही मूळ बायकाच. त्यात माझा रोल तू करणार म्हणजे दुग्धशर्करा योग. हा माझ्या समाजाचा खूप मोठा सन्मान, तुझ्या धाडसाला त्रिवार सलाम.’

 

पुढे गौरी यांनी चित्रपटाच्या टीमसोबतही एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये कॅप्शन दिलं, ‘कोण म्हणत परिवार नाही. दिवसेंदिवस तुमच्या सारख्या गोड माणसांची भर पडतच चाललीये. समानतेच्या वाटेवर तुम्ही दिलेल्या प्रेमाची मी आयुष्यभर ऋणी राहीन..आज हॆ लिहिताना डोळ्यांच्या कडा ओलावल्या, पण जेव्हा मी जगाचा निरोप घेईन तेव्हा तुमच्या डोळ्याचे अश्रू कोणी पुसू शकणार नाही. देवाचे आभार. नांदुया सौख्य भरे.’ गौरी यांच्या दोन्ही पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

कोण आहेत गौरी सावंत?
‘ताली’ हा प्रोजेक्ट ज्यांच्या आयुष्यावर आधारीत आहे त्या गौरी सावंत या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत.गौरी सावंत यांचा जन्म पुण्यात झाला. गौरी या महिला आणि अनाथ मुलांसाठी काम करतात. त्या तृतीयपंथी असून २०१० मध्ये त्यांनी तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी सखी चारचौघी ही संस्था स्थापन केली. ट्रान्सजेंडर आई म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. तृतीयपंथी असल्याचे जाणवल्यानंतर ज्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी नाकारले आणि त्यामुळे घर सोडलेल्या तृतीयपंथीयांना आधार देण्यासाठी गौरी सावंत यांचं कार्य मोठे आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’मध्ये अर्जुन कपूर खलनायक होणार का? निर्मात्याचे ‘हे’ विधान आलं समोर

प्रदर्शनापूर्वीच ‘आदिपुरुष’ वादाच्या भोवऱ्यात, दिल्ली कोर्टात बंदीच्या मागणीची याचिका दाखल

हे देखील वाचा