Monday, October 27, 2025
Home बॉलीवूड सुहान अन् आर्यांच्या वागण्याचं कौतुक! व्हायरल व्हिडिओ वेधतोय सर्वांचे लक्ष

सुहान अन् आर्यांच्या वागण्याचं कौतुक! व्हायरल व्हिडिओ वेधतोय सर्वांचे लक्ष

शाहरुख खानची मुलं सुहाना खान आणि आर्यन खान अशी स्टार किड्स आहेत, ज्यांची लोकप्रियता कोणत्याही स्टारपेक्षा कमी नाही. त्यांचे फोटो असोत किंवा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता अलीकडेच, सुहाना तिचा भाऊ आर्यन खानसोबत विमानतळावर दिसली, जिथे दोघेही खूप स्टायलिश दिसत होते. दोघांनीही कॅज्युअल लूक कॅरी केला असला, तरी दोघांनीही सगळ्यांचे लक्ष वेधले.

व्हिडिओमध्ये आर्यन (Aryan khan) याने पांढरे शूज, काळी पँट आणि टी-शर्ट परिधान केले होते, ज्यामध्ये तो खूपच सुंदर दिसत होता. दुसरीकडे, सुहाना खान (Suhana khan) हिने ऑफ-व्हाइट जॉगर्स आणि मॅचिंग क्रॉप जॅकेटसह पांढरा क्रॉप टॉप घातला होता. या लूकमध्ये ती खूप छान दिसत होती. सोशल मीडियावर युजर सुहाणाच्या फिटनेस संदर्भात बोलत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

स्टार किडच्या वागण्याचं कौतुक
मात्र, यादरम्यान आणखी एका गोष्टीची चर्चा झाली, ती म्हणजे सुहाना आणि आर्यनचे सीआयएसएफ जवानांसोबतचे वागणे. सुहाना आणि आर्यन यांनी सर्व प्रोटोकॉल अतिशय शांतपणे पाळले आणि जोपर्यंत अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी पूर्ण केली नाही तोपर्यंत दोघेही त्यांच्यासोबत मुंबई विमानतळाबाहेर दिसले. दोघांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्टार किडच्या या वागण्याचं कौतुकही केलं जात आहे. चाहते या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

‘द आर्चीज’ या चित्रपटातून सुहाणा करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण
सुहाणाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहानासोबत बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, मिहिर आहुजा, वेदांग रैना आणि युवराज मेंडा हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत. चाहते या चित्रपटाची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

अब्दू रोजिकने सांगितले त्याच्या शाळेतील वाईट अनुभव, कमी उंचीमुळे शाळेतून काढले होते बाहेर
अय्यो! उर्फी जावेदला टक्कर देण्यासाठी मैदानात उतरली मोनू देओरी, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा